Crime : प्रेमाचा भयानक अंत! विवाहित रेखानं बॉयफ्रेंड पंकजची निर्घृण हत्या केली; चेहऱ्यावर अ‍ॅसिड ओतलं अन्...

Married woman kills boyfriend over blackmail in Ballia : उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात विवाहित महिलेने प्रियकर पंकज गुप्ताची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
husband wife News
husband wife NewsSaam TV Marathi
Published On

Extramarital affair murder case in Ballia district : उत्तर प्रदेशातून माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत क्रूर घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने बॉयफ्रेंडची निर्घृण हत्या केली. बायकोच्या या काळ्या कृत्यात तिला नवऱ्याने साथ दिली. धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून आरोपींनी प्रियकराच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड ओतून विद्रूप केला. अनैतिक संबंधांतून निर्माण झालेल्या वादातून हा भयानक कट रचल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेने बलियातील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव पंकज गुप्ता असल्याचे समोर आलेय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पंकज गुप्ता हा विवाहित गर्लफ्रेंडला गेल्या काही दिवसांपासून ब्लॅकमेल करत होता. त्यामुळे वैतागलेल्या गर्लफ्रेंडने नवऱ्याच्या मदतीने पंकजच्या हत्येचा कट रचला. पंकज याची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणात ३ आरोपींना अटक केली. तर दोन फरार आहेत. हत्येत वापरलेल्या वस्तू पोलिसांनी जप्त केल्या असून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. एसपी ओमवीर सिंह म्हणाले की, १० फेब्रुवारी रोजी लोहटा गावात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पंकज गुप्ता अशी झाली आहे. तो आजमगडमधील लाहिडीहचा रहिवासी होता.

husband wife News
Property Right : सासू-सासऱ्याच्या संपत्तीवर जावई-सुनेचा हक्क असतो का? कायदा काय सांगतो

पंकज गुप्ता याचे शेजारी राहणाऱ्या रेखा सिंह हिच्यासोबत प्रेसंबंध होतो. रेखा विवाहित होती. दोघांमध्ये काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. पण गेल्या काही दिवसांपासून रेखा आणि पंकज यांच्यामध्ये वाजले होते. पंकज हा अश्लील फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून रेखाला ब्लॅकमेल करत होता. काही दिवसांपूर्वी रेखाने मेहुणी अंजनी आणि तिचा पती अरुण सोनी यांना याबद्दल माहिती दिली. ५ फेब्रुवारी रोजी अंजनीच्या धाकट्या बहिणीचे लग्न होणार होते. रेखा, तिचा पती अरुण, तिचा भाऊ विजय पाल सिंग आणि तिची मेहुणी अंजनी लग्नाला उपस्थित राहण्यासाठी आले होते. त्यावेळी पंकज याच्या हत्येचा कट रचला.

husband wife News
Dharashiv : भल्या पहाटे कलाकेंद्र चालकाच्या घरी सशस्त्र दरोडा, ६ जण घरात घुसले अन्....

रेखाने पंकजला फोन करून भेटण्यास बोलवल. त्यानंतर आरोपींनी चाकूने गळा चिरून त्याची हत्या केली. आरोपींनी त्याची बॅग आणि कपडे जाळले. त्याच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही केला. पोलिसांनी या प्रकरणी ३ जणांना बेड्यो ठोकल्या आहेत. मुख्य आरोपी रेखा आणि अरूण सोनी हे फरार आहेत. हत्येत वापरलेली बाईक, चाकू, मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले.

husband wife News
राज्यसभा निवडणुकीपूर्वी धमाका; 'हा' पक्ष भाजपमध्ये विलीन होणार? दिल्लीत हालचालींना वेग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com