Dharashiv : भल्या पहाटे कलाकेंद्र चालकाच्या घरी सशस्त्र दरोडा, ६ जण घरात घुसले अन्....

Maharashtra crime news today : धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात पहाटे सशस्त्र दरोडा टाकून सहा जणांनी पिस्तूल व सुरा दाखवत तब्बल ९ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. येरमाळा पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
Crime
CrimeSaam tv
Published On

बालाजी सुरवसे, धाराशिव, साम टीव्ही प्रतिनिधी

armed robbery at cultural centre owner house Dharashiv : धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील चोराखळी येथे पहाटे सशस्त्र दरोड्याची थरारक घटना घडली असून,कालिका सांस्कृतिक कलाकेंद्र चालकाच्या घरी सहा जणांनी घुसखोरी करून पिस्तूल व लोखंडी सुरा दाखवत तब्बल ९लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी येरमाळा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.चोराखळी (ता. कळंब) येथील रहिवासी व कालिका सांस्कृतिक लोकनाट्य कलाकेंद्राच्या संचालिका निर्मला मोहन जाधव (वय ४५) या चोराखळी येथे धाराशिव साखर कारखान्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ लगत असलेल्या त्यांच्या कलाकेंद्राच्या दुसऱ्या मजल्यावर कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांच्यासोबत लहानपणापासूनची मैत्रीण रेखा किशोर शिंदे (रा. टाकळी, जि. परभणी) व शिवम उर्फ गळ्या गंगावणे हेही राहत होते.

तक्रारीनुसार, मागील काही महिन्यांपासून तेरखेडा येथील सचिन उर्फ प्रशांत बापू पवार व महादेव विठ्ठल घुले यांचा कलाकेंद्रावर ये–जा होता. आर्थिक व्यवहारातून वाद निर्माण झाल्यानंतर सचिन पवार याने घरफोडीची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने चोराखळीतील कलाकेंद्र सील झाल्यानंतर निर्मला जाधव यांनी बार्शी (जि. सोलापूर) येथे भाड्याने दुसरे कलाकेंद्र सुरू केले होते. रविवारी ता. २ पहाटे नेहमीप्रमाणे बार्शी येथील कलाकेंद्र बंद करून पहाटे साडेतीनच्या सुमारास निर्मला जाधव, रेखा शिंदे, शिवम उर्फ गळ्या व चालक शशिकांत मुंडे हे इनोव्हा गाडीने चोराखळी येथे परतत असताना एका चारचाकी वाहनाने पाठलाग केल्याचे जाणवले. पहाटे साडेपाचच्या सुमारास घराचे दार उघडे असतानाच तोंडाला अर्धवट कापड बांधलेले सहा इसम घरात शिरले.

Crime
Property Right : सासू-सासऱ्याच्या संपत्तीवर जावई-सुनेचा हक्क असतो का? कायदा काय सांगतो

त्यापैकी दोघांनी शिवम गंगावणे याला जमिनीवर दाबून धरले, एकाने निर्मला जाधव यांच्या डोक्याला पिस्तूल लावले, तर दुसऱ्याने रेखा शिंदे यांच्या गळ्याला लोखंडी सुरा लावला. आरडाओरड केल्याने आरोपींनी तिघांच्या डोळ्यांत चटणी टाकून जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर आरोपींनी निर्मला जाधव यांच्या अंगावरील सुमारे १२१.६०० ग्रॅम वजनाचे अंदाजे ६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, चार मोबाईल फोन (किंमत सुमारे ३ लाख ४९ हजार रुपये) तसेच सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण ९ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

Crime
राज्यसभा निवडणुकीपूर्वी धमाका; 'हा' पक्ष भाजपमध्ये विलीन होणार? दिल्लीत हालचालींना वेग

दरोड्यावेळी समोर उभा असलेला एक आरोपी सचिन उर्फ प्रशांत पवार असल्याचे ओळखूनही जीवाला धोका असल्याने त्यांनी तात्काळ ओळख उघड केली नाही,असे तक्रारीत नमूद आहे. या दरोड्यात सचिन पवारसह पाच अज्ञात आरोपींचा तसेच महादेव घुले याचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून येरमाळा पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याचे सपोनि तात्या भालेराव यांनी सांगितले.

Crime
Hypersonic Missile : इराणचा जोरदार पलटवार, शक्तिशाली हायपरसोनिक क्षेपणास्त्राचा वापर, धडकी भरवणारा व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com