BCCI President resigns  social media
Sports

आशिया कपआधी BCCI मध्ये मोठी घडामोड, अध्यक्ष रॉजर बिन्नी यांचा राजीनामा, राजीव शुक्लांवर मोठी जबाबदारी

बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. विद्यमान उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्याकडे हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Nandkumar Joshi

  • बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांचा राजीनामा- सूत्र

  • राजीव शुक्ला यांच्याकडे हंगामी अध्यक्षपदाची सूत्रे

  • शुक्ला यांच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयच्या शिखर समितीची बैठक

  • नवीन स्पॉन्सरशिपच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा

आशिया कप २०२५ आधीच बीसीसीआयमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी पदाचा राजीनामा दिल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. उपाध्यक्ष राजीव शुक्लांकडे प्रभारी अध्यक्षपदाची सूत्रे दिली आहेत.

बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. नवीन अध्यक्ष निवडीपर्यंत राजीव शुक्ला हे बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष असतील. शुक्ला हे बीसीसीआयचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत.

दैनिक जागरणने सूत्रांच्या हवाल्यानं वृत्त प्रकाशित केलं आहे. बीसीसीआयच्या शिखर समितीची बैठक ही राजीव शुक्लांच्या अध्यक्षतेखाली झाली. स्पॉन्सरशिपचा मुद्दा या बैठकीच्या अजेंड्यावर होता. त्यात ड्रीम ११ चा करार संपुष्टात येणे आणि पुढील दोन-अडीच वर्षांसाठी नव्याने स्पॉन्सरचा शोध घेण्याबाबत चर्चा झाली.

रिपोर्टनुसार, आशिया कप २०२५ ही स्पर्धा दोन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे. तोपर्यंत नव्याने स्पॉन्सर मिळणे कठीण आहे, असे मानले जात आहे. रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं की, या स्पर्धेला दोन आठवडेही उरले नाहीत. आम्ही प्रयत्न करत आहोत, पण नव्याने निविदा काढणे, कायदेशीर प्रक्रियेचे पालन करणे आणि अन्य तांत्रिक गोष्टींसाठी वेळ लागतो.

शॉर्ट टर्म म्हणजेच केवळ आशिया कपसाठी प्रायोजक शोधण्याच्या प्रश्नावरही सूत्रांनी सांगितले की असं करता येणार नाही. २०२७ च्या वनडे वर्ल्डकपपर्यंत नवीन प्रायोजक मिळवणे यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. राजीव शुक्ला हे बीसीसीआयचे नवे अध्यक्ष निवडीपर्यंत कार्यवाहक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. नव्या कायद्यानुसार, बीसीसीआयला पुढील महिन्यात वार्षिक सर्वसाधारण बैठक बोलावणे तसेच निवडणूकही घ्यायला लागणार आहे, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Flood : बीडमध्ये पावसाचा धुमाकूळ; कुर्ला गावात 75 नागरिक पुरात अडकले, एनडीआरएफचे जवान मदतीला

Fact Check : अमित शाहांनी मागितला नरेंद्र मोदींचा राजीनामा? ऑपरेशन सिंदूरदरम्यान मोठी चूक झाली? Video

पाकिस्तानच्या 'वाढीव' बॉलरची अर्शदीप सिंगनं मैदानातच काढली लायकी; व्हिडिओ होतोय व्हायरल, Video

Rain Alert : महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट, पुढचे ६ दिवस राहा सतर्क!

Bank Holidays List 2025: देशभरातील बँकांना आठवडाभरात बंपर सुट्ट्या; जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT