Asia Cup : वर्ल्डकप जिंकूच शकत नाही! टीम इंडियाच्या निवडीवर महान खेळाडू भडकला

Team India for Asia Cup 2025 : निवड समितीचे माजी प्रमुख आणि महान खेळाडू श्रीकांत यांनी आशिया कपसाठी केलेल्या टीम इंडियाच्या निवडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सध्याचा संघ बघता भारत २०२६ चा टी २० वर्ल्डकप जिंकूच शकत नाही, असं श्रीकांत म्हणाले.
Team India sqaud for asia cup 2025 (File Photo)
Team India sqaud for asia cup 2025 (File Photo)saam tv
Published On
Summary
  • आशिया कपआधीच टीकेचे चौकार-षटकार

  • टीम इंडियाच्या निवडीवरून उडाला भडका

  • दिग्गज क्रिकेटपटूचा यॉर्कर

आशिया कप २०२५ साठी टीम इंडियाची निवड झाली आणि वादाला तोंड फुटलं. क्रिकेट चाहते आणि अनेक दिग्गज खेळाडूंनी टीम इंडियाच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर अजित आगरकर, प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर टीका देखील केली. आता महान खेळाडू आणि निवड समितीचे माजी प्रमुख श्रीकांत यांनीही संताप व्यक्त केला आहे. २०२६ मध्ये टी २० वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे आणि भारत ही स्पर्धा जिंकणार नाही, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

भारतीय संघ आशिया कप जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जातो. पण तरीही या चमूसह टी २० वर्ल्डकपमध्ये तग धरू शकणार नाही, असं श्रीकांत म्हणाले. टीम इंडियात निवडलेले काही खेळाडू, फलंदाजी क्रम यावरूनही टीकास्त्र डागलं. तसेच काही खेळाडूंच्या समावेशावर प्रश्नचिन्हही उपस्थित केले.

कदाचित आशिया कप जिंकू, पण...

माजी दिग्गज क्रिकेटपटू श्रीकांत यांनी यूट्यूबवर प्रतिक्रिया दिली. आपण कदाचित या संघासह आशिया कप जिंकू, पण वर्ल्डकप जिंकण्याची कोणतीच संधी नाही. तुम्ही या संघाला वर्ल्डकपसाठी घेऊन जाणार आहात का? अवघ्या सहा महिन्यांवर आलेल्या टी २० वर्ल्डकपची तयारी मानली जात आहे का?, असे सवालही श्रीकांत यांनी उपस्थित केले.

अक्षर पटेल याला उपकर्णधारपदावरून हटवलं आहे. मला हेच समजत नाही की रिंकू सिंह, शिवम दुबे, हर्षित राणा हे संघात कसे आले? आयपीएलच्या कामगिरीवर संघ निवड केली जाते. पण निवड समितीच्या सदस्यांनी त्यांची याआधीच्या कामगिरीचा विचार तरी केला का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

आशिया कपसाठी टीम इंडियाच्या चमूमध्ये शुभमन गिलचं कमबॅक झालं आहे. त्याची निवड उपकर्णधार म्हणून झाली आहे. अलीकडेच तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशी अनिर्णित राखली. गिल जुलै २०२४ मध्ये श्रीलंका संघाविरुद्ध टी २० सामना खेळला होता. अक्षर पटेलला इंग्लंडविरुद्ध जानेवारीत झालेल्या मालिकेत टी २० संघाचा उपकर्णधार केला होता, पण ही जबाबदारी आता शुभमन गिलला दिली आहे.

Team India sqaud for asia cup 2025 (File Photo)
Team India : भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ! गंभीरनंतर आता धोनीवर ऑलराउंडरचा धक्कादायक आरोप

फलंदाजी क्रमावर टीका

श्रीकांत यांनी टीम इंडियाच्या फलंदाजी क्रमावरही प्रश्न उपस्थित केले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला कोण येणार? संजू सॅमसन, जितेश शर्मा, शिवम दुबे किंवा रिंकू सिंह यांच्यापैकी एकाला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवायला हवं. हार्दिक पंड्या पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्यामुळं अक्षर सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकत नाही. त्यांनी दुबेला कसं निवडलं, हेच मला समजत नाही. यशस्वी जयस्वालने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे, याकडंही श्रीकांत यांनी लक्ष वेधलं.

Team India sqaud for asia cup 2025 (File Photo)
वर्ल्डकप फायनलमध्ये युवराजच्या आधी धोनीला बॅटिंगला का पाठवलं? सचिन तेंडुलकरनं सांगितली कारणं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com