वर्ल्डकप फायनलमध्ये युवराजच्या आधी धोनीला बॅटिंगला का पाठवलं? सचिन तेंडुलकरनं सांगितली कारणं
२०११ वर्ल्डकप फायनलमध्ये युवराजआधी धोनी मैदानात का आला?
भारतीय क्रिकेट चाहत्यांना पडलेल्या प्रश्नाचं सचिन तेंडुलकरनं दिलं उत्तर
विरेंद्र सेहवागचा तो दावा खरा ठरला, सचिननं सांगितली दोन कारणं
भारतानं २०११ मध्ये वनडे वर्ल्डकप जिंकला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा हा एक क्षण होता. मात्र, या फायनलमधला एक प्रश्न कायम क्रिकेटच्या चाहत्यांच्या मनात घर करून राहिला होता. फायनलमध्ये युवराज सिंगच्या आधी महेंद्रसिंगला फलंदाजीला का उतरवण्यात आलं होतं?... हा निर्णय सचिन तेंडुलकरचा होता, असं विरेंद्र सेहवागनं सांगितलं होतं. याबाबत एका चाहत्यानं सोमवारी रेडिटवर आस्क मी एनिथिंग या सत्रात एका चाहत्यानं सचिन तेंडुलकरलाच थेट प्रश्न विचारला. त्यावर क्रिकेटचा देव असलेल्या सचिननं उत्तर दिलं.
२०११ च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व महेंद्रसिंग धोनी करत होता. या सामन्यात भारतीय संकटात संकटात सापडला होता. त्यावेळी फॉर्मात असलेल्या युवराज सिंगच्या आधी महेंद्रसिंग धोनीला मैदानात उतरवण्यात आलं होतं. पण हा निर्णय कर्णधार म्हणून धोनीनं घेतलाच नव्हता. तो सल्ला सचिन तेंडुलकरनं दिला होता. मुंबईच्या वानखेडे मैदानात भारत आणि श्रीलंका यांच्यात फायनलचा सामना झाला होता. श्रीलंकेनं प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट गमावून २७४ धावा केल्या होत्या. हे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. ११४ धावांवर ३ महत्वाच्या विकेट पडल्या होत्या. विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, विराट कोहलीसारखे दिग्गज धुरंधर बाद झाले होते.
कोहली बाद झाल्यानंतर एरवी युवराज सिंग हा मैदानात येतो. पण त्याच्या जागी महेंद्रसिंग धोनी मैदानात फलंदाजीसाठी उतरला. या निर्णयामागे सचिन तेंडुलकर होता. त्यानेच त्यावेळचा प्रशिक्षक गॅरी कर्स्टन याला हा सल्ला दिला होता. काही महिन्यांनी विरेंद्र सेहवागनं याबाबतचा खुलासा केला होता. रेडिटवर सचिन तेंडुलकरचा आस्क मी एनिथिंग या सेशनमध्ये एका चाहत्यानं याच्याशीच संबंधित प्रश्न विचारला. सेहवागनं जे सांगितलं ते खरं आहे का आणि ऐनवेळी रणनीती बदलण्याचं कारण काय होतं, असा प्रश्न विचारला.
सचिन तेंडुलकरनं चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना या रणनीती बदलामागे दोन कारणं सांगितली. लेफ्ट-राईट कॉम्बिनेशनमुळं दोन्ही ऑफ स्पिनरची कोंडी होणार होती. याशिवाय मुरलीधरन हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघातून खेळला होता. धोनीनं नेटमध्ये त्याची गोलंदाजी खेळून काढली होती.
२०११ च्या फायनलमध्ये विरेंद्र सेहवागच्या रुपानं भारताला पहिला झटका लागला होता. एक धाव असतानाच तो बाद झाला होता. त्यानंतर धावफलकावर अवघ्या ३० धावा होत्या आणि सचिन तेंडुलकर १८ धावा करून तंबुत परतला होता. गौतम गंभीर आणि विराट कोहलीच्या भागीदारीनं डाव सावरला खरा, पण ११४ धावांवर कोहली बाद झाला. त्यानं ३५ धावा केल्या होत्या. गौतम गंभीर हा डावखुरा फलंदाज असल्यानं सचिननं युवराजऐवजी महेंद्रसिंग धोनीला फलंदाजीला उतरवण्याचा सल्ला दिला.
धोनी आणि गंभीर यांच्यात ११९ धावांची भागीदारी झाली. गंभीर अवघ्या तीन धावांनी शतकापासून वंचित राहिला. तो बाद झाल्यानंतर युवराज सिंह फलंदाजीला उतरला. या जोडीनं भारताला विजय मिळवून देत विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. धोनीने ७९ चेंडूंत ९१ धावांची नाबाद खेळी केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.