team india coaching staff saam tv
Sports

Team India Coching Staff: टीम इंडियाचा कोचिंग स्टाफ बदलणार! BCCI मोठा निर्णय घेणार

New Batting Coach For Team India: भारतीय संघाला गेल्या काही महिन्यांपासून हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. दरम्यान आता बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाला गेल्या काही महिन्यात हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. आधी न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर खेळताना कसोटी मालिका गमवावी लागली. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर गावसकर मालिका ३-१ ने गमवावी लागली. या फ्लॉप कामगिरीनंतर बीबीसीआय ॲक्शन मोडमध्ये आहे.

कर्णधार रोहित शर्मा, हेड कोच गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. माध्यमातील वृत्तानुसार, या बैठकीत भारतीय संघाला नवा फलंदाजी प्रशिक्षक मिळणार असल्याची चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे.

राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर ही जबाबदारी गौतम गंभीरकडे सोपवण्यात आली होती. त्याने ही जबाबदारी स्वीकारताच सपोर्ट स्टाफ निवडण्याचा हक्क मागितला होता. त्यानुसार, गंभीरने गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून मॉर्ने मॉर्कल आणि सहाय्यक प्रशिक्षक म्हणून रायन टेन डोइशे आणि अभिषेक नायरची निवड केली होती. मात्र फलंदाजी प्रशिक्षकाची निवड केली गेली नव्हती.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघाची फलंदाजी आणखी मजबूत व्हावी म्हणून, बीसीसीआय फलंदाजी प्रशिक्षकाची नियुक्ती करणार आहे. विराट कोहली, रोहित शर्मासह संघातील प्रमुख खेळाडू जेव्हा आऊट ऑफ फॉर्म असतील तेव्हा या निर्णय घेतला जाऊ शकतो. माध्यमातील वृत्तानुसार, या पदासाठी अनेक नावं चर्चेत आहेत, मात्र बीसीसीआयने कुठल्याही नावावर शिक्कामोर्तब केलेलं नाही.

भारतीय संघाला बॉर्डर गावसकर ट्रॉफी कुठल्याही परिस्थितीत जिंकायची होती. मात्र ही मालिका भारताने ३-१ ने गमावली. त्यामुळे भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या फायनलमधून बाहेर पडावं लागलं आहे. आता बीसीसीआय अभिषेक नायर आणि रायन टेन डोइशे यांच्यावर करडी नजर ठेऊन असणार आहे. तसेच खेळाडूंकडूनही रिव्ह्यू घेतला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: साई चरणी सोन्याचा त्रिशुळ अर्पण, बहीण भावाकडून सुवर्णदान

CM Devendra Fadnavis: वरळी दहीहंडीतून फडणवीसांचा हल्ला; पापाची हंडी फुटली, विकासाची हंडी लागेल|VIDEO

Solapur News : एसीचा स्फोट आणि होत्याच नव्हतं झालं; सोलापुरात महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Online Meeting : शिक्षण विभागाची ऑनलाइन मीटिंग, अचानक अश्लील व्हिडिओ शेअर; शिक्षिकेवर कारवाई

Mirchi Bhaji: पावसाळ्यात बनवा कुरकुरीत अन् खमंग मिरची भजी; सोपी रेसिपी वाचा

SCROLL FOR NEXT