Rahul Dravid Head Coach: राहुल द्रविड पुन्हा झाला मुख्य कोच, कुणी दिली संधी?

Rajasthan Royals Coach : भारतीय संघाचा माजी हेड कोच राहुल द्रविड आयपीएल २०२५ मध्ये दिसणार आहे. राजस्थान रॉयल्स संघाचा मुख्य कोच म्हणून राहुलची निवड झाल्याचं वृत्त आहे.
Rajasthan Royals Rahul Dravid
Rahul Dravid Head Coachyandex
Published On

IPL 2025, Rajasthan Royals : आयपीएल २०२५ मध्ये राहुल द्रविड संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स संघाला क्रिकेटचे धडे शिकवणार आहे. राहुल द्रविड याची राजस्थानच्या मुख्य कोच म्हणून निवक्ती करण्यात आली आहे. मेंटरिंग आणि कोच अशा दुहेरी भूमिकेत राहुल दिसणार आहे. राहुल द्रविड आणि संजू जोडी राजस्थानला पुन्हा जेतेपद पटकावून देणार का? याची उत्सुकता आहे.

राहुल द्रविडच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाने नुकतेच टी२० विश्वचषकावर नाव कोरलेय. त्याशिवाय २०२३ चा वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धडक मारली होती. राहुलच्या कोचिंगमध्ये राजस्थान जेतेपद पटकावेल, असा विश्वास मॅनेजमेंटला आहे.

ईएसपीएनक्रिकइन्फो'च्या रिपोर्ट्सनुसार, राहुल द्रविडने राजस्थान रॉयल्ससोबत नुकताच एक करार केला आहे. आयपीएल २०२५ साठी होणारा मेगालिलावाआधी राहुल द्रविड रिटेन करण्यात येणाऱ्या खेळाडूंबाबत चर्चा करणार आहे. राहुल द्रविड आणि संजू सॅमसन यांच्यामध्ये चांगले संबंध आहेत. संजू सॅमसन टीम इंडियाच्या अंडर १९ संघामध्ये खेळत होता, तेव्हापासून राहुल द्रविड ओळखतो. दोघांमध्ये चांगला ताळमेळ आहे.

राहुल द्रविड आणि राजस्थान रॉयल्स यांचेही नाते जुने आहे. आयपीएल २०१२ आणि २०१३ या हंगामात राहुल द्रविड राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार होता. त्याशिवाय 2014 आणि 2015 आयपीएल हंगामात द्रविड राजस्थानचा डॉयरेक्टर आणि मेंटोर होता.

Rajasthan Royals Rahul Dravid
Rahul Dravid, Head Coach: राहुल द्रविड हेड कोच म्हणून परतणार! समोर आली मोठी अपडेट

श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकारा या संघासाठी डायरेक्टर ऑफ क्रिकेटची भूमिका पार पाडतोय. जर राहुल द्रविड यांनी ही जबाबदारी स्वीकारली, तर या संघाची ताकद आणखी वाढेल. राहुल द्रविड यांना मुख्य प्रशिक्षकपदाचा दांडगा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी राजस्थान रॉयल्स संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये काम केलं आहे. यासह त्यांनी भारताच्या अंडर १९ संघाला देखील प्रशिक्षण दिलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय अंडर १९ वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली होती. यामध्ये आता टी-२० वर्ल्डकपच्या ट्रॉफीचीही भर पडली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com