Border Gavaskar Trophy : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; प्रसिद्ध कृष्णाची एन्ट्री, तर स्टार खेळाडू बाहेर

Border Gavaskar Trophy team india squad : बॉर्डर-गावस्कर सीरीजसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. या संघात प्रसिद्ध कृष्णाची एन्ट्री झाली आहे
indian test cricket team
indian test cricket teamyandex
Published On

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्ध आगामी बॉर्डर गावस्कर सीरीजसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय टीम पुढच्या महिन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघाचे पाच कसोटी सामने ऑस्ट्रेलियाविरोधात होणार आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी १८ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या संघात प्रसिद्ध कृष्णाला एन्ट्री मिळाली आहे. तर कुलदीप यादव संघाबाहेर गेला आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बॅकअप सलामीवर म्हणून अभिमन्यू ईश्वरनला जागा मिळाली आहे. तर जलद गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाची संघात अचानक एन्ट्री झाली आहे. नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा याला पहिल्यांदा भारतीय संघात स्थान मिळालं आहे. कुलदीप यादव कमरेत त्रास जाणवत असल्यामुळे त्याला संघात स्थान मिळालं नाही. अष्टपैलू अक्षर पटेलला देखील संघात स्थान मिळालं नाही.

indian test cricket team
WTC Final Scenario : टीम इंडियासमोरचा मार्ग काटेरी, पण अशक्य नाही! 'असं' असेल WTC फायनलचं समीकरण!

मोहम्मद शमीला पुन्हा एकदा संघात स्थान मिळालं नाही. मोहम्मद शमी अद्याप दुखापतीतून बाहेर आला नाही. काही दिवसांपूर्वीच रोहित शर्माने म्हटलं होतं की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करणे खूप अवघड आहे. त्याला एक दुखापत झाली आहे. त्याच्या घुडघ्याला सूज आली आहे. त्याची स्थिती चांगली नाही. त्याला पुन्हा एकदा सुरुवात करावी लागेल. अनफिट शमीला आम्ही ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर घेऊन जाऊ शकत नाही. आम्हाला आशा आहे की, तो लवकरच १०० टक्के बरा होईल'.

indian test cricket team
Virat Kohli Six: आजच्याच दिवशी विराटने खेचलेला 'ग्रेटेस्ट Six ऑफ ऑल टाईम' पाहा VIDEO

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकिपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्म सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नीतीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com