Virat Kohli Six: आजच्याच दिवशी विराटने खेचलेला 'ग्रेटेस्ट Six ऑफ ऑल टाईम' पाहा VIDEO

Virat Kohli Six To Haris Rauf: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आजच्याच दिवशी हॅरीस रउफच्या गोलंदाजीवर ग्रेटेस्ट Six ऑफ ऑल टाईम खेचला होता.
Virat Kohli Six: आजच्याच दिवशी विराटने खेचलेला 'ग्रेटेस्ट Six ऑफ ऑल टाईम' पाहा VIDEO
virat kohlitwitter
Published On

Virat Kohli Six News: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेचा थरार ऑस्ट्रेलियात पार पडला होता. या स्पर्धेत आजच्याच दिवशी म्हणजे २३ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. हा सामना कुठलाच क्रिकेट फॅन विसरु शकणार नाही.

एखाद्याला झोपेतून उठवून विचारलं, तरी तो फॅन या सामन्याबद्दल सांगू शकतो. या सामन्यात बॅकफूटवर असलेल्या भारतीय संघाला विराटने सावरुन संघाला विजय मिळवून दिला होता. यादरम्यान त्याने हॅरीस रऊफच्या एका षटकात षटकार खेचला होता. तो हॅरीस रऊफ कधीच विसरु शकणार नाही.

या सामन्यात पाकिस्तानने सुरुवातीपासूनच भारतीय संघावर दबाव टाकला होता. धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी मोठे धक्के दिले. मात्र विराट एकटा उभा होता. सामना जेव्हा दूर जात होता. त्यावेळी विराटने हॅरीस रऊफच्या १९ व्या ओव्हरमध्ये २ षटकार खेचत भारतीय संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवलं होतं. दरम्यान पाचव्या चेंडूवर खेचलेला षटकार हा आयकॉनिक ठरला होता.

Virat Kohli Six: आजच्याच दिवशी विराटने खेचलेला 'ग्रेटेस्ट Six ऑफ ऑल टाईम' पाहा VIDEO
IND vs NZ: सतत संधी मिळूनही ठरतोय फ्लॉप! रोहित या स्टार खेळाडूला बसवणार

एका बाजूने विकेट्स ,पडत होत्या, तर दुसरीकडे विराट एकटा पाकिस्तानी गोलंदाजांना नडत होता. विराटने १८ व्या षटकात शाहीन आफ्रिदीला ३ चौकार खेचत १७ धावा गोळा केला. इथून भारतीय संघाने सामन्यात कमबॅक केलं.

Virat Kohli Six: आजच्याच दिवशी विराटने खेचलेला 'ग्रेटेस्ट Six ऑफ ऑल टाईम' पाहा VIDEO
IND vs NZ 2nd Test: दुसऱ्या कसोटीचा निकाल ३ दिवसात लागणार? खेळपट्टी कोणाला देणार साथ ; पाहा पिच रिपोर्ट

शेवटच्या २ षटकात भारतीय संघाला विजयासाठी ३१ धावांची गरज होती. १९ वे षटक टाकण्यासाठी हॅरीस रऊफ गोलंदाजीला आला. सुरुवातीच्या ४ चेंडूंवर त्याने अवघ्या ३ धावा खर्च केल्या होत्या. जिंकण्यासाठी अजूनही २८ धावा करायच्या होत्या. मग काय, विराटने पुढील २ चेंडूंवर लागोपाठ २ षटकार खेचले आणि भारताला विजयाच्या जवळ पोहोचवलं. शेवटच्या षटकात भारतीय संघाने हा सामना जिंकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com