IND vs NZ, Weather Prediction: बंगळुरुत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहे.
मालिकेत १-० ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघासाठी कुठल्याही परिस्थितीत तिसरा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे. पहिल्या सामन्यात खेळपट्टीमुळे भारतीय संघाचा विजय निसटला. दरम्यान दुसऱ्या सामन्यात कशी असेल खेळपट्टी? या खेळपट्टीवर गोलंदाज की फलंदाज? कोणाला मदत मिळणार? जाणून घ्या.
क्रिकइन्फोच्या वृ्त्तानुसार, पुण्यातील खेळपट्टीवर काळ्या मातीचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरु शकते. या खेळपट्टीवर गवत नसणार आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांचा चेंडू उसळी घेणार नाही. बंगळुरुतील खेळपट्टी पहिल्या दिवसापासून वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरली. सामन्यातील पाचही दिवस वेगवान गोलंदाजांना मदत मिळत होती.
मात्र पुण्यात आणि मुंबईत फिरकी गोलंदाजांना मदत मिळेल, अशी खेळपट्टी बनवली जाणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांच्या फिरकीवर नाचताना दिसून येतील. पुण्यात काळ्या मातीचा तर मुंबईत लाल मातीचा वापर करुन खेळपट्टी तयार केली जाणार आहे.
भारतीय संघ या मालिकेत १-० ने पिछाडीवर आहे. त्यामुळे मालिका बरोबरीत आणण्यासाठी भारतीय संघाला दुसरा सामना जिंकावा लागणार आहे. या सामन्यातही भारतीय संघ ३ फिरकी गोलंदाजांसह उतरु शकतो.
या मैदानावरील रेकॉर्ड पाहिला, तर २०२६-१७ बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाने ३३३ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात फिरकी गोलंदाज ओ कीफने १२ गडी बाद केले होते. या सामन्यातील ४० पैकी ३१ विकेट्स फिरकी गोलंदाजांनी घेतल्या होत्या. त्यामुळे आर अश्विन, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजावर महत्वाची जबाबदारी असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.