Sarfaraz Khan: सरफराज बनला 'बापमाणूस'; पत्नीने गोंडस बाळाला दिला जन्म- PHOTO

Sarfaraz Khan Becomes Father: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्यातील हिरो सरफराज खानला पुत्ररत्नप्राप्ती झाली आहे.
Sarfaraz Khan: सरफराज बनला 'बापमाणूस'; पत्नीने गोंडस बाळाला दिला जन्म- PHOTO
sarfaraz khantwitter
Published On

Sarfaraz Khan News In Marathi: भारताचा युवा स्टार फलंदाज सरफराज खान सध्या तुफान चर्चेत आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या मालिकेसाठी त्याला भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.

या संधीचं सोनं करत त्याने पहिल्याच कसोटीत १५० धावांची शानदार खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं होतं. दरम्यान आता तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सरफराज खानची पत्नी रोमान जहुरने मुलाला जन्म दिला आहे

आज (२२ ऑक्टोबर) सरफराज खानचा वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवसाच्या २ तासांपूर्वी खान कुटुंबात चिमुकल्याचे आगमन झाले आहे. २१ ऑक्टोबरला रात्री १० वाजता त्याच्या पत्नीने मुलाला जन्म दिला.

पोस्ट शेअर करत दिली माहिती

सरफराज खान हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुड न्यूज दिली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्याने २ फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तो आपल्या मुलासोबत असल्याचं दिसून येत आहे. या फोटोमध्ये सरफराज खानसह त्याचा भाऊ नौशाद खान देखील असल्याचं दिसून येत आहे.

सरफराज खान ६ ऑगस्ट २०२३ मध्ये विवाह बंधनात अडकला होता. त्याच्या पत्नीचं नाव रोमान जहुर असं आहे. दोघांचा विवाहसोहळा काश्मीरमध्ये पार पडला होता. दरम्यान स्टार खेळाडूंनी या पोस्टवर कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Sarfaraz Khan: सरफराज बनला 'बापमाणूस'; पत्नीने गोंडस बाळाला दिला जन्म- PHOTO
IND vs NZ: पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल! स्टार खेळाडू संघात परतला

अशी सुरु झाली लव्हस्टोरी

रोमाना आणि सरफराज हे दोघेही काश्मीरमध्ये विवाहबंधनात अडकले. या दोघांची लव्हस्टोरी जरा हटके आहे. तर सरफराजची ही बहीण दिल्लीतील कॉलेजमध्ये शिक्षण घेते. याच कॉलेजमध्ये रोमाना जहूर देखील तिच्यासोबत शिक्षण घेत होती.

एकाच कॉलेजमध्ये असल्याने दोघेही चांगल्या मैत्रिणी झाल्या. आधी दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं. प्रकरण पुढे गेल्यानंतर दोघांनी मिळून बहिणीला सांगण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ही गोष्ट घरच्यांपर्यंत पोहोचली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com