IND vs NZ: पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल! स्टार खेळाडू संघात परतला

Team India Squad For 2nd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान या पराभवानंतर भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे.
IND vs NZ: पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल! स्टार खेळाडू संघात परतला
team indiatwitter
Published On

Team India Squad For 2nd Test: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाला ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह न्यूझीलंडने १-० ने आघाडी घेतली आहे.

या पराभवानंतर दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघात बदल करण्यात आला आहे. दुसऱ्या सामन्यासाठी धाकड अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासाठी संघात मोठा बदल करण्यात आला आहे. बीसीसीआयने पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. वॉशिंग्टन सुंदर हा गोलंदाजीसह फलंदाजीतही मोलाचं योगदान देऊ शकतो. त्यामुळे त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

वॉशिंग्टन सुंदरबद्दल बोलायचं झालं तर, त्याला भारतीय संघांसाठी ४ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. २०२१ मध्ये तो भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या ४ सामन्यातील ६ डावात फलंदाजी करताना त्याने ६६.२५ च्या सरासरीने २६५ धावा केल्या आहेत. यादरम्यान ९६ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. यासह गोलंदाजी करताना त्याने आतापर्यंत ६ गडी बाद केले आहेत.

दुसऱ्या कसोटीसाठी असा आहे भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उप-कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com