Ind vs Pak Asia Cup 2025 Final x
Sports

Asia Cup 2025 : एक चूक अन् टीम इंडियाचा पराभव निश्चित! IND vs Pak मध्ये भारताला 'ही' गोष्ट करावी लागेल फॉलो

Ind vs Pak Asia Cup 2025 Final : आशिया कप २०२५ मधील अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघाला एका गोष्टीकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

Yash Shirke

  • आशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघ फक्त क्षेत्ररक्षणातच मागे राहिला आहे.

  • सुपर ४ मध्ये टीम इंडियाने १२ झेल सोडले, कॅचिंग क्षमता फक्त ६७.५%.

  • फायनलमध्ये पाकिस्तानवर विजय मिळवण्यासाठी भारताला क्षेत्ररक्षण सुधारावे लागेल.

Asia Cup 2025 IND Vs Pak Final : दुबईमध्ये आशिया कप २०२५ मधील अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यामध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. आशिया कपमध्ये भारताने सर्व सामने जिंकले आहेत, दुसऱ्या बाजूला पाकिस्ताननेही भारतीय संघ वगळता इतर संघांविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे.

भारतीय संघाने आशिया कप २०२५ मध्ये समाधानकारक कामगिरी केल्याचे म्हटले जात आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन विभागांमध्ये टीम इंडिया भक्कम आहे. पण क्षेत्ररक्षणात होणाऱ्या चुका ही भारतासाठी चिंतेची बाब ठरत आहे. सर्व सामन्यांमध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात चुका केल्याचे दिसले. अनेक कॅच सुटल्याने विरुद्धच्या संघाला फायदा झाल्याचेही पाहायला मिळाले.

आशिया कप २०२५ मध्ये क्षेत्ररक्षणात भारतीय संघ काहीसा मागे पडला आहे. सुपर ४ मध्ये भारतीय संघातील खेळाडूंनी तब्बल १२ झेल सोडले आहेत. संघाची कॅचिंग क्षमता ६७.५ टक्के इतकी आहे. आशिया कपमध्ये सहभागी झालेल्या आठ संघांपैकी ही शेवटून दुसऱ्या क्रमांकाची टक्केवारी आहे. झेल घेण्यामध्ये हाँगकाँगचा संघाची टक्केवारी ५२.७ टक्के आहे.

जर भारताला आशिया कप २०२५ ची ट्रॉफी जिंकायची असेल, तर भारतीय संघातील खेळाडूंना क्षेत्ररक्षणावर लक्ष द्यावे लागणार आहे. नाहीतर याचा फायदा पाकिस्तानच्या संघाला होईल. Catches win matches अशी इंग्रजीत म्हण आहे. त्या म्हणीप्रमाणे भारतीय खेळाडूंनी अंतिम सामन्यात चांगला खेळ केला, तर संघाला पाकिस्तानवर सहज विजय मिळवता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गझवा-ए-हिंदसाठी ५० लाख हल्लेखोर तयार; शेजारील देशात शिजतोय भारतावरील हल्ल्याचा कट

Maharashtra Politics: मुंबईचा महापौर आपलाच, एकनाथ शिंदेंचा शिवसैनिकांना कानमंत्र|VIDEO

Asia Cup 2025 Final : पॉवर प्लेमध्ये दुबे, बुमराहकडून गोलंदाजी! फायनलसाठी खास 'प्लान', भारताचा प्रयोग यशस्वी होणार?

Maharashtra Live News Update: नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी 2 हजार 200 कोटींचा पहिला हप्ता मंजूर

Maharashtra Weather: अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT