Asia cup 2025 Trophy x
Sports

Asia Cup 2025 Trophy : नकवीच्या हाती शेवटची बघितलेली आशिया कप ट्रॉफी आता आहे कुठे? अचूक माहिती आली समोर

Where is Asia Cup Trophy : एसीसी प्रमुख मोहसिन नकवी यांच्याकडून आशिया ट्रॉफी घेण्यास भारतीय संघाने नकार दिला. त्यानंतर नकवी ट्रॉफी घेऊन गेले. आता ही ट्रॉफी कुठे आहे? जाणून घ्या.

Yash Shirke

  • आशिया कप २०२५ ट्रॉफी भारतीय संघाने नाकारल्यानंतर मोहसिन नकवी घेऊन गेले.

  • भारतीय संघाच्या बहिष्कारामुळे ट्रॉफी दुबईतील एसीसी मुख्यालयात ठेवण्यात आली.

  • नकवी वादानंतर काही भारतीय खेळाडूंनी फक्त वैयक्तिक पुरस्कार स्वीकारले.

Where is the Asia Cup 2025 trophy? आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने ५ विकेट्सने पाकिस्तानचा पराभव केला. २१ दिवसात भारताने सलग तिसऱ्यांदा पाकिस्तानवर मात केली. सामना संपल्यानंतर भारताचा संघ आणि आशिया क्रिकेट परिषदचे प्रमुख मोहसिन नकवी यांच्या वाद झाल्याचे पाहायला मिळाले. नकवी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघाने नकार दिला.

भारताने शेवटच्या ओव्हरमध्ये सामना जिंकत पाकिस्तानचा धुव्वा उडवला. सामन्यानंतर एसीसीचे प्रमुख म्हणजे मोहसिन नकवी हे व्यासपीठावर आले. नकवी यांच्या उपस्थितीत भारतीय संघाने व्यासपीठावर येण्यास नकार दिला. यामुळे शेवटच्या सत्कार समारंभाला एका तासापेक्षा जास्त वेळ लागला. त्यानंतर मोहसिन नकवी यांनी इकर कोणालाही ट्रॉफी देण्याचा मान देण्यास नकार दिला.

भारतीय संघाने बहिष्कार टाकल्याने मोहसिन नकवी हे व्यासपीठावरुन रागाच्या भरात निघून गेले. त्यानंतर एसीसी अधिकारी नकवी यांच्या मागे आशिया कपची ट्रॉफी घेऊन गेले. ही ट्रॉफी आता कुठे आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, आशिया कप ट्रॉफी दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जवळ असलेल्या एसीसी मुख्यालयात ठेवण्यात आली आहे. हे ठिकाण डीआयसीएसपासून फक्त ४ किलोमीटर अंतरावर आहे.

मोहसिन नकवी व्यासपीठावरुन गेल्यानंतर काही भारतीय खेळाडूंनी सत्कार समारंभात सहभागी झाले. तिलक वर्मा, अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादव यांनी इतर मान्यवरांकडून त्यांचे पुरस्कार स्वीकारले, अन्य खेळाडूंनी प्रेझेंटर सिम डौल यांच्याशी संवाद साधला. भारतीय संघ नकवी यांच्या उपस्थितीत ट्रॉफी स्वीकारणार नाही असे एसीसीने सांगितल्याचे डौल यांनी माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पासवर्ड न टाकता WiFi करा कनेक्ट, ही आहे एकदम सोपी ट्रिक्स

Bigg Boss 19-Pranit More : प्रणित मोरे 'बिग बॉस १९' का जिंकला नाही? 'ही' आहेत कारणे

Maharashtra Live News Update: विरोधी पक्षनेतेपदाबाबत अफवा, अफवांवर विश्वास ठेवू नका - आदित्य ठाकरे

जनावरांच्या गोठ्यात चिमुकलीवर बलात्कार; नंतर नराधमानं धार्मिक स्थळाजवळ आयुष्य संपवलं

Black Spots Onion: काळे डाग अन् बुरशी लागलेला कांदा खावा का? आरोग्यासाठी किती घातक? जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT