Cricketer Retirement : प्रसिद्ध क्रिकेटपटूने घेतली तडकाफडकी निवृत्ती, आशिया कप २०२५ नंतर केली मोठी घोषणा

Chris Woakes Retirement : भारत विरुद्ध इंग्लंड ओव्हल कसोटीत ख्रिस वोक्सचा गंभीर दुखापत झाली होती. यामुळे त्याला अ‍ॅशेस दौऱ्यातून पडावे लागले. यामुळे वोक्सने निवृत्तीचा निर्णय घेतला.
Chris Woakes Retirement
Chris Woakes Retirementx
Published On
Summary
  • ख्रिस वोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

  • भारताविरुद्ध दुखापतीमुळे अ‍ॅशेसमधून बाहेर पडला.

  • इंग्लंडने वोक्सच्या कराराचे नूतनीकरण केले नाही.

Retirement : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंडचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. १५ वर्षांच्या शानदार क्रिकेट कारकिर्दीला त्याने निरोप दिला. दोन विश्वचषक विजयी संघांमध्ये त्याचा समावेश होता. कसोटी क्रिकेटमध्येही त्याने मोठे योगदान दिले. भारत विरुद्ध इंग्लंड पाचव्या कसोटीमध्ये ख्रिसच्या खांद्याला दुखापत झाली होती. या दखापतीमुळे तो अ‍ॅशेस दौऱ्यातून बाहेर पडला.

ख्रिस वोक्सच्या मुख्य वार्षिक कराराचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने नूतनीकरण केले नाही. यामुळे त्याने २०२६ मध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी देशांतर्गत क्रिकेटमध्ये कारकीर्द सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड क्रिकेटमध्ये ख्रिस वोक्सचे मोठे योगदान आहे. इंग्लंडच्या संघाला दोन विश्वचषक जिंकण्यासाठी त्याने मदत केली आहे. कसोटी क्रिकेटमध्येही त्याने चांगली कामगिरी केली. तो इंग्लंडच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक होता.

Chris Woakes Retirement
Tilak Varma : तिलक वर्माचं पाकिस्तानमध्येही तोंडभरून कौतुक, दिग्गजांनी काढली आपल्याच संघाची लाज, वाचा कोण काय म्हणाले?

अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीदरम्यान ओव्हल कसोटीत ख्रिस वोक्सच्या खांद्याला दुखापत झाली होती. ही दुखापत त्याच्यासाठी दुर्दैवी ठरली. या दुखापतीमुले त्याला अ‍ॅशेस मालिकेतून बाहेर पडावे लागले. इंग्लंडचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज म्हणून तो अ‍ॅशेस मालिकेत खेळण्याची आशा करत होता. पण दुखापतीमुळे त्याच्या आशा धुळीस मिळाल्या.

Chris Woakes Retirement
Tilak Varma : तिलक वर्माचा मास्टरक्लास! सूर्याभाऊही झुकला, षटकार पाहून गंभीरने दिली भन्नाट Reaction; पाहा Video

ख्रिस वोक्सने इंग्लंडकडून ६२ कसोटी सामन्यांमध्ये १९२ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या बाजूला, वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये त्याने १५५ सामन्यांत २०४ गडी बाद केले आहेत. २०१९ मध्ये इऑन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली ५० षटकांचा विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघात तो एक महत्त्वाचा खेळाडू होता. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने नाव कमावले आहे. इंग्लंडमध्ये देशांतर्गत सामन्यांमध्ये त्याने २३.४७ च्या सरासरीने १४८ बळी घेतले आहेत.

Chris Woakes Retirement
हाच तो फरक! तिलक वर्मा सिनियरच्या पाया पडला, पाकिस्तानच्या माजोरड्या कॅप्टननं काय केलं बघा? Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com