Mysore Pak Recipe: घरी बनवा पारंपरिक आणि स्वादिष्ट गोड पदार्थ म्हैसूर पाक रेसिपी, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

बेसन, साजूक तूप, साखर आणि पाणी हे मुख्य साहित्य लागते. उत्तम चव आणि पोत मिळण्यासाठी शुद्ध तूप वापरणे महत्त्वाचे आहे.

Mysore Pak Recipe | yandex

बेसन भाजून घ्या

कढईत थोडे तूप गरम करून त्यात बेसन मंद आचेवर भाजा. बेसनाचा कच्चा वास जाईपर्यंत हलवत राहा.

Mysore Pak Recipe | yandex

साखरेची पाक तयार करा

दुसऱ्या भांड्यात साखर आणि पाणी घेऊन एकतारी पाक तयार करा. पाक योग्य झाला की मिठाईची टेक्स्चर छान येते.

Mysore Pak Recipe | Saam Tv

बेसन आणि पाक एकत्र करा

तयार पाकात हळूहळू भाजलेले बेसन घाला आणि सतत ढवळत राहा, जेणेकरून गाठी होणार नाहीत.

Mysore Pak

तूप हळूहळू घाला

गरम तूप थोडे-थोडे करून मिश्रणात घालत राहा. मिश्रण फुलून हलके झाले की योग्य टेक्स्चर मिळते.

Mysore Pak Recipe | Saam Tv

ताटात ओता आणि सेट होऊ द्या

तूप लावलेल्या ताटात मिश्रण ओतून समान पसरवा. थोडे थंड झाल्यावर हव्या त्या आकारात कापा.

Mysore Pak Recipe | Saam tv

सर्व्ह करा आणि साठवणूक

म्हैसूर पाक पूर्ण थंड झाल्यावर डब्यात साठवा. चहासोबत किंवा सणासुदीला सर्व्ह करण्यासाठी हा उत्तम गोड पदार्थ आहे.

Mysore Pak Recipe | Saam Tv

Wedding Hairstyle: लग्नसराईसाठी साडीवर करा 5 मिनिटांत होणाऱ्या या 7 ट्रेंडी बन हेअरस्टाईल नक्की ट्राय करा

Wedding Hairstyle
येथे क्लिक करा