Shruti Vilas Kadam
केसांची वेणी घालून बन तयार केल्यास हेअरस्टाईलला स्टायलिश ट्विस्ट मिळतो. सिल्क किंवा पैठणी साडीवर ही स्टाईल खास खुलते.
थोडासा सैल आणि नैसर्गिक लुक देणारा मेसी बन रिसेप्शन किंवा संगीत कार्यक्रमासाठी योग्य. हलक्या कर्ल्समुळे लुक अधिक आकर्षक दिसतो.
उंच बांधलेला बन चेहऱ्याला शार्प लुक देतो. जड दागिने आणि ग्रँड साडीवर हा स्टाईल खास रॉयल वाटतो.
एका बाजूला बन बांधल्यास चेहऱ्याला सॉफ्ट आणि मॉडर्न टच मिळतो. ऑफ-शोल्डर ब्लाऊज किंवा डिझायनर साडीवर हा लुक उठून दिसतो.
समोर हलका पफ ठेवून मागे लो बन बांधल्यास चेहऱ्याला व्हॉल्युम मिळतो. गोल चेहऱ्यासाठी ही स्टाईल खास शोभून दिसते.
केसांचे छोटे-छोटे ट्विस्ट करून बन तयार केल्यास लुक अधिक एलिगंट दिसतो. एंगेजमेंट किंवा रिसेप्शनसाठी योग्य पर्याय.
साडीवर सर्वात एलिगंट दिसणारी ही हेअरस्टाईल आहे. मानेला खाली सैलसर बन बांधल्याने चेहऱ्याचे फीचर्स उठून दिसतात आणि पारंपरिक लुक मिळतो.