Manasvi Choudhary
उन्हाळ्याच्या दिवसात थंडगार दही खाल्ला जातो. दही आरोग्याच्या दृष्टीने देखील फायदेशीर आहे.
मात्र आयुर्वेदाच्या काही नियमानुसार, दही खाल्ल्यानंतर तुम्ही काही पदार्थ खाणे चुकीचे आहे ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो.
दह्यासोबत किंवा दही खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नका यामुळे पोटात गॅस, अॅसिडिटी आणि मळमळ होते.
दही खाल्ल्यानंतर कोणतेही नॉनव्हेज पदार्थ खाऊ नका यामुळे चेहऱ्यावर रॅशेस, इनफेक्शन होते.
दही आंबट असते यामुळे दही खाल्ल्यानंतर संत्री लिंबू आणि अननस कोणतीही आंबट फळे खाऊ नका
दही थंड आहे आणि कांदा शरीरात उष्णता निर्माण करतो. हे 'थंड-गरम' मिश्रण शरीरात गेल्याने त्वचेला खाज सुटणे, पुरळ येणे या समस्या उद्भवू शकतात.
दही नेहमी दिवसा खावे. रात्री दही खाल्ल्याने कफ वाढतो आणि पचन नीट होत नाही.