Suryakumar Yadav x
Sports

Asia Cup 2025 फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का, ICC ने सूर्यावर केली मोठी कारवाई

Suryakumar Yadav : आशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी रंगणार आहे. या सामन्याआधी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादववर आयसीसीने कारवाई केली आहे.

Yash Shirke

Asia Cup 2025 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सूर्याविरुद्ध आयसीसीकडे तक्रार दाखल केली. आयसीसीने सूर्यकुमार यादवला आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे.

आयसीसीने सूर्यकुमार यादवची मॅच फी कापण्यात आली आहे. टीम इंडियाच्या कर्णधाराच्या मॅच फीच्या एकूण रकमेतील ३० टक्के रक्कम जमा करण्यात आली आहे. हा निर्णय मॅच रेफरी रिची रिचर्डसन यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे. फक्त सूर्याच नाही तर पाकिस्तानच्या काही खेळाडूंवर देखील आयसीसीने कारवाई केली आहे.

'पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांसोबत आम्ही आहोत. आम्ही सर्वजण एक आहोत. हा विजय मी आमच्या सैन्याला आणि सशस्त्र दलांना समर्पित करू इच्छितो. मला आशा आहे की, ते आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहतील आणि जेव्हा-जेव्हा आम्हाला संधी मिळेल, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यांवर हास्य आणण्याचा प्रयत्न करत राहू', असे वक्तव्य सूर्यकुमार यादवने भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यानंतर केले होते.

आयसीसीने दंडात्मक कारवाई केल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या मॅच फीमधून ३० टक्के रक्कम कापली जाईल. सूर्याला प्रत्येक सामन्यासाठी ३,००,००० रुपये मिळतात. मॅच फीमधील ९०,००० हजार रुपये कपात करण्यात आली आहे. सूर्यासोबत पाकिस्तानच्या हरिफ रौफवर देखील कारवाई झाली आहे. त्यांच्या मानधनातूनही ३० टक्के कपात केली आहे. साहिबजादा फरहानही दोषी आढळला, पण त्याच्यावर दंडात्मक कारवाई झाली नाही, त्याला फक्त समज देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT