jodie grinham twitter
Sports

Jodie Grinham: आईपण भारी देवा! 7 महिन्यांच्या गर्भवतीने अचूक नेम साधला अन् मेडलही जिंकलं

7 Months Old Athlete Won Bronze Medal In Paralympics 2024: पॅरिसमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत ७ महिन्यांची गर्भवती असलेल्या ज्युडी ग्रिनहॅमने कांस्यपदकावर नेम साधला आहे.

Ankush Dhavre

काही दिवसांपूर्वीच पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेचा थरार पार पडला. या स्पर्धेत ७ महिन्यांची गर्भवती असून तलवारबाजी करण्यासाठी मैदानात उतरणाऱ्या इजिप्तच्या नादा हफिझला कोण विसरेल? गर्भवती असूनही ऑलिम्पिक सारख्या स्पर्धेत ती तलवारबाजीसारख्या धाडसी खेळात लढण्यासाठी उतरली होती.

असंच काहीसं धाडस पॅरालिम्पिक स्पर्धेत केल्याचे पाहायला मिळाले आहे. ग्रेट ब्रिटनची ज्युडी ग्रिनहॅम (Jodie Grinham) देखील ७ महिन्यांची गर्भवती आहे. ती मैदानात उतरली आणि तिने पदकही जिंकलं.

ग्रेट ब्रिटनचं प्रतिनिधित्व करणारी ज्युडी ग्रिनहॅम पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत तिरंदाजीसाठी आली आहे. दरम्यान ३१ ऑगस्टला तिरंदाजीतील कांस्यपदकासाठीच्या लढतीत ती ग्रेट ब्रिटनच्या फोयबे पॅटरसनचा सामना करण्यासाठी मैदानात उतरली.

पॅटरसन ही तिच खेळाडू आहे, जिने पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. सुवर्ण पदकविजेत्या खेळाडूविरुद्ध खेळताना ज्युडी ग्रिनहॅम जरा ही डगमगली नाही. हा सामना तिने १४२-१४१ ने आपल्या नावावर केला.

ज्युडी ग्रिनहॅमने रचला इतिहास

ज्युडी ग्रिनहॅमने ज्यावेळी कांस्यपदक जिंकलं त्यावेळी ७ महिन्यांची गर्भवती होती. ७ महिन्यांची गर्भवती असतानात पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिलीच खेळाडू ठरली आहे.

ज्युडी ग्रिनहॅमबद्दल बोलायचं झालं, तर ती डाव्या हाताने अपंग आहे. त्यामुळे ती तिरंदाजी करताना केवळ आपल्या उजव्या हाताचा वापर करते. एका हाताने तिरंदाजी करत तिने कांस्यपदकावर निशाणा साधला आहे.

एकेरी प्रकारात कांस्यपदकाला गवसणी घातल्यानंतर, तिला मिश्र प्रकारात आणखी एक पदक जिंकण्याची संधी आहे. तिने तिरंदाजीतील मिश्र प्रकारात क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे तिला आणखी एक पदक जिंकून इतिहास रचण्याची संधी असणार आह

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पालकांनो मुलांना सांभाळा,12 व्या मजल्यावरून पडून चिमुकलीचा मृत्यू

Fatty Liver In Women's: फॅटी लिव्हर असल्यास महिलांमध्ये दिसतात 'अशी' लक्षणे

मुळशीत घरात शिरला भला मोठा साप, आजीनं दाखवला धमाका

Joe Root : सचिन तेंडुलकरचा महाविक्रम धोक्यात, 'मास्टर ब्लास्टर'चा रेकॉर्ड इंग्लंडचा जो रूट मोडणार?

India-UK Trade Deal: भारत-ब्रिटन मुक्त व्यापाराचा फायदा नेमका कुणाला?; काय स्वस्त- काय महाग होणार?

SCROLL FOR NEXT