नवी दिल्ली : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये दुसऱ्या दिवशी भारतासाठी गूड न्यूज हाती आली आहे. भारताची नेमबाज अवनी लेखराने कमाल केली आहे. अवनीने महिलांच्या १० मीटर एअर रायफल इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. या इव्हेंटमध्ये भारताच्या मोना अग्रवालने कांस्यपदक जिंकलं आहे. या दोन पदकामुळे पॅरालिम्पिकमध्ये भारताने सुरुवात केली आहे.
२२ वर्षांच्या अवनी लेखराने २४९.७ अंक मिळवून पॅरालिम्पिकमध्ये विक्रम केला आहे. अवनीने टोकयो येथील पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्टॅडिंग एसएच१ स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं होतं. त्यानंतर अवनीने पॅरालिम्पिकमध्ये दुसरं सुवर्णपदक जिंकलं आहे. तसेच अवनी पॅरालिम्पिकमध्ये ३ पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.
तीन वर्षापूर्वी पहिल्या टोकयो पॅरालिम्पिकमध्ये एसएच१ श्रेणीत अवनीने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे अवनीची जोरदार चर्चेत होती. अवनीने पॅरालिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण आणि ५० मीटर रायफलमध्ये तिसरं स्थान पटकावलं होतं.
भारताने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये दोन पदक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, 'अवनी लेखरा यांनी आर२ महिला १० एम एअर एसएच१ स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. त्यांनी इतिहास रचला आहे. ती तिसरं पॅरालिम्पिक पदक जिंकणारी पहिली महिला अॅथलीट ठरली आहे. त्यांचं खेळाप्रती समर्पण भारतासाठी अभिमानास्पद आहे'.
मोना अग्रवाल यांना शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, 'मोना अग्रवाल यांनी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये आर२ महिला १०एम एअर रायफल एसएच१ स्पर्धा कांस्यपदक जिंकल्याबद्दल शुभेच्छा. भारताला मोना यांचा गर्व आहे'.
दरम्यान, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये ५ महिन्याआधी २२ वर्षीय नेमबाज अवनी लेखराची एक किडनी स्टोनची शस्त्रक्रिया झाली होती. किडनी स्टोनमुळे सरावादरम्यान तिला त्रास व्हायचा. त्यामुळे तिने मार्च महिन्यात ऑपरेशन करण्याचं ठरवलं होतं. शस्त्रक्रिया झाल्यानंतर पॅरालिम्पिकमध्ये चांगली कामगिरी केली. २०१२ साली ११ वर्षांची असताना अवनीचा अपघात झाला होता. त्यानंतर तिला लखवा मारला होता. लखवा मारल्यामुळे पाठीच्या कण्यला दुखापत झाली होती. कमरेपासून खालच्या अंगाला अर्धांगवायू झाला होता. त्यामुळे पाठीचा कणा आणि मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.