आशियाई पॅरालिम्पिक (Paris Paralympics 2024) स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घालणाऱ्या शीतल देवीने पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत शानदार सुरुवात केली आहे. दोन्ही हाथ नसलेली तिरंदाज शीतल देवी (Sheetal Devi) वैयक्तिक कंपाउड ओपन रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी राहिली. या शानदार कामगिरीसह तिने राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान पहिल्याच पॅरालिम्पिक स्पर्धेत तिने वर्ल्ड रेकोर्ड नोंदवला आहे.
शीतलने ७२० पैकी ७०३ गुणांची कमाई केली. तर अव्वल स्थानी असलेली तुर्कीची तिरंदाज ओजनुर गिर्डी क्युरने ७२० पैकी ७०४ गुणांची कमाई केली. तिने पहिल्याच फेरीत ग्रेट ब्रिटेनची तिरंदाज फोएबे पाईन पेटरसन ६९८ च्या रेकॉर्डला मागे सोडलं.
मात्र हा रेकॉर्ड तिला फार काळ टिकवून ठेवता आला नाही. ओजनुरने हा रेकॉर्ड मोडून काढला. शीतलने राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला असून तिची पुढील फेरी शनिवारी होणार आहे.
शीतल देवीने राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला आहे. तिचा पुढील फेरीतील सामना कोरियाची चोइ ना मी आणि चिलीची मारियाना जूनिया यांच्यात होणाऱ्या राऊंड ऑफ ३२ सामन्यातील विजेत्या सोबत होणार आहे.
शीतलने हांगजाऊ चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला होता. या स्पर्धेत तिने २ सुवर्ण पदकांना गवसणी घातली होती. असा रेकॉर्ड करणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली होती. त्यानंतर तिने रौप्य पदकालाही गवसणी घातली होती. यासह तिने या स्पर्धेत एकूण ३ पदकांची कमाई केली होती. पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतही तिच्याकडून पदकांची आशा असणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.