भारतीय खेळाडूंनी आशियाई पॅरा गेम्समध्ये इतिहास रचलाय. भारतीय खेळाडूंनी १०० पेक्षा जास्त पदकं जिंकली आहेत. या गेम्समध्ये भारतीय खेळाडूंची आतापर्यंतची ही सर्वात्तम कामगिरी राहिलीय. (Latest News)
चीनमधील हांगझोऊमध्ये खेळलेल्या जाणाऱ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय पॅरा अॅथेलिट्सने शनिवारी इतिहास रचला. भारतीय खेळाडूंनी पहिल्यांदा शंभरपेक्षा जास्त पदकं मिळवत सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. भारतीय पॅरा अॅथेलिट्सने १११ पदकं जिंकली आहेत. तर आंतरराष्ट्रीय गेम्समध्ये भारताचं हे सर्वक्षेष्ठ असं प्रदर्शन राहिलंय. याआधी २०१०मध्ये ग्वांग्झूत झालेल्या अशियाई पॅरा गेम्समध्ये १४ पदकं जिंकत भारत १५ स्थानावर होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्यानंतर २०१४मध्ये भारत पदक तालिकाच्या यादीत १५ व्या स्थानी होता. तर २०१८ मध्ये भारत ९ व्या स्थानी होता. दरम्यान भारताने तिसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय टूर्नामेंटमध्ये १०० पेक्षा जास्त पदकं जिंकली आहेत. भारताने याआधी २०१०मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्येही १०१ पदकं जिंकली होती.
दरम्यान चीनमध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय पॅरा खेळाडूंनी २९ सुवर्ण, ३१ सिल्वर, आणि ५१ ब्रान्ज पदकं जिंकली आहेत. याआधी आशियाई गेम्समध्ये भारताने १०७ पदक जिंकली होती. तर चीनने ५२१ पदक जिंकली आहेत. त्याचबरोबर इरानने १३१ पदक जिंकली आहेत.
आशियाई पॅरा गेम्सच्या पदक तालिकेत भारत पाचव्या स्थानी आहे. तर चीन या तालिकेत पहिल्या स्थानी आहे. त्यानंतर इरान दुसऱ्यास्थानी आहे. तालिकेत तिसऱ्या आणि चौथ्यास्थानी कोरिया आहे.भारतीय पॅरालम्पिक समितीच्या अध्यक्षा दीपा मलिक म्हणाल्या की, भारताने इतिहास रचलाय. भारताच्या पॅर अॅथेलिट्सांनी देशाचा गौरव केलाय. आता पॅरिस पॅरालम्पिकमध्ये टोक्योपेक्षा जास्त पदकं जिंकतील. दरम्यान या कामगिरीवर त्यांना आश्चर्य वाटलं नाहीये.
कारण त्यांना या गेम्समध्ये ११० ते ११५ च्या दरम्यान पदकं जिंकू अशी अपेक्षा होती. परंतु १११ आकडा हा शुभ आहे. भारतीय खेळाडूंनी अॅथलेटिक्समध्ये सर्वात जास्त ५५ पदकं जिंकली आहेत. तर बॅडमिंटन खेळाडूंनी ४ सुवर्ण पदकासह २१ पदकं जिंकली आहेत. बुद्धीबळात ८ आणि तिरंदाजीमध्ये ७ पदकं भारताने जिंकली आहेत. तर नेमबाजांनी ६ पदक जिंकली आहेत. शेवटच्या दिवशी भारतांनी ४ सुवर्णासह १२ पदकं जिंकली आहेत. यात ७ पदकं बुद्धीबळात तर ४ अॅथलेटिक्समध्ये आणि एक नौकानयनमध्ये जिंकलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.