Paris Paralympics 2024: तिसऱ्या दिवशी भारताला आणखी 4 पदकं मिळणार? जाणून घ्या आजचं संपूर्ण वेळापत्रक

Paris Paralympics 2024 Todays Schedule: भारतीय खेळाडूंनी सुरुवातीच्या २ दिवसांत ४ पदकांवर नाव कोरलं आहे. दरम्यान तिसऱ्या दिवसाचं संपूर्ण वेळापत्रक.
Paris Paralympics 2024: तिसऱ्या दिवशी भारताला आणखी 4 पदकं मिळणार? जाणून घ्या आजचं संपूर्ण वेळापत्रक
paris paralympicstwitter
Published On

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. संपूर्ण पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला केवळ ६ पदकं जिंकता आली होती. दरम्यान पॅरिस पॅरालिम्पिक सुरुवातीच्या २ दिवसात भारतीय खेळाडूंनी ४ पदकं जिंकली आहेत.

ज्यात १ गोल्ड, १ सिल्व्हर आणि २ ब्राँझ मेडलचा समावेश आहे. सुरुवातीचे २ दिवस गाजवल्यानंतर तिसऱ्या दिवशी भारताच्या पदक तालिकेत आणखी ४ पदकं येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

आज भारतीय खेळाडू सायकलिंग आणि पॅरा शूटिंगमध्ये भारताला पदक जिंकून देऊ शकतात. मात्र पदक जिंकण्यासाठी भारतीय खेळाडूंनी मेडल राऊंडसाठी पात्र ठरणं अतिशय महत्वाचं असणार आहे.

अवनीने साधला गोल्डवर निशाणा

भारताची स्टार शूटर अवनी लेखराने पुन्हा एकदा कोट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. तिने १० मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच १ प्रकारात गोल्ड मेडलवर निशाणा साधला आहे.

यापूर्वी तिने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतही गोल्ड मेडलवर निशाणा साधला होता. यावेळी तिने आपलं गोल्ड मेडल राखलं आहे. तर याच प्रकारात भारताच्या आणखी एका शूटरने पदकावर नाव कोरलं आहे. या प्रकारात मोना अगरवालने ब्राँझ मेडल पटकावलं आहे.

Paris Paralympics 2024: तिसऱ्या दिवशी भारताला आणखी 4 पदकं मिळणार? जाणून घ्या आजचं संपूर्ण वेळापत्रक
Paris paralympics 2024 : अवनी लेखरा कोण आहे? पॅरालिम्पिकमध्ये मिळवून दिलं पहिलं गोल्ड मेडल, महाराष्ट्रात का होतेय ट्रेंड?

असं आहे आजचं संपूर्ण वेळापत्रक (३१ ऑगस्ट) (Paris Paralympics 2024 Todays Schedule)

पॅरा बॅडमिंटन

महिला एकेरी, एसएल ३ ग्रुप प्ले स्टेज - दुपारी १२ वाजता

पुरुष एकेरी, एसएल ३ ग्रुप प्ले स्टेज - दुपारी १:२० वाजता

पुरुष एकेरी, एसएल ४ ग्रुप प्ले स्टेज - दुपारी २:४० वाजता

पुरुष एकेरी, एसएल ४ ग्रुप प्ले स्टेज - दुपारी ३:२० वाजता

महिला एकेरी SU 5 ग्रुप प्ले स्टेज - ४ वाजता

Paris Paralympics 2024: तिसऱ्या दिवशी भारताला आणखी 4 पदकं मिळणार? जाणून घ्या आजचं संपूर्ण वेळापत्रक
Paris Paralympics 2024 : प्रीती पालने रचला इतिहास, पॅरालिंपिकमध्ये पदक जिंकलं; ऐतिहासिक क्षणाचा VIDEO बघा!

शूटिंग

पुरुष १० मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच 1 (क्वालीफिकेशन)- स्वरूप महावीर उन्हालकर - दुपारी १ वाजता.

महिला १० मीटर एअर पिस्तूल,एसएच1 (क्वालीफिकेशन)- रूबीना फ्रांसिस - दुपारी ३:३० वाजता.

ट्रॅक सायकलिंग

महिला ५०० मीटर टाइम ट्रायल सी1-3 (क्वालीफिकेशन)- ज्योती गडेरिया - दुपारी १:३० वाजता

पुरुष १००० मीटर टाइम ट्रायल सी1-3 (क्वालीफिकेशन)- अरशद शेख - दुपारी १:४९ वाजता.

रेपेचेज

मिश्र पीआर3 डबल स्कल्स (रेपेचेज)- भारत (अनीता आणि नारायण कोंगनापल्ले) - दुपारी ३:०० वाजता.

तिरंदाजी

महिला कंपाउंड राऊंड (1/8 एलिमिनेशन 2)- सरिता देवी विरुद्ध एलोनोरा सारती (इटली) - संध्याकाळी ७:०० वाजता.

महिला कंपाउंड राऊंड (1/8 एलिमिनेशन 8)- सरिता देवी विरुद्ध मारियाना ज़ुनिगा (चिली) - संध्याकाळी ८:५९ वाजता.

ॲथलेटिक्स

पुरुष- भालाफेक, एफ57 (मेडल इवेंट)- प्रवीन कुमार - रात्री १०:३० वाजता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com