Paris Paralympics 2024 : प्रीती पालने रचला इतिहास, पॅरालिंपिकमध्ये पदक जिंकलं; ऐतिहासिक क्षणाचा VIDEO बघा!

Preethi Pal News: पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताने तिसऱ्या पदकाची कमाई केली आहे. धावपटू प्रीती पालने 100 मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकावलं आहे.
प्रीती पालने रचला इतिहास, पॅरालिंपिकमध्ये 100 मीटर शर्यतीत मेडल जिंकणारी ठरली पहिली भारतीय
Preethi Pal NewsSaam Tv
Published On

पॅरिस पॅरालिंपिकमध्य भारतासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारताने तिसऱ्या पदकाची कमाई केली आहे. धावपटू प्रीती पालने 100 मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकावलं आहे. प्रीतीने महिलांच्या 100 मीटर टी-35 अंतिम फेरीत तिसरे स्थान पटकावलं.

यासह पॅरालिम्पिक स्पर्धेत ट्रॅक इव्हेंटमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. याआधी आज अवनी लेखरा हिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफल एसएच1 फायनल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं. तर मोना अग्रवालने कांस्यपदक जिंकलं होतं.

प्रीती पालने रचला इतिहास, पॅरालिंपिकमध्ये 100 मीटर शर्यतीत मेडल जिंकणारी ठरली पहिली भारतीय
Paris Paralympics 2024: दोन्ही हात नाही, मात्र वेध अर्जुनसारखा! Sheetal Devi ने रचला इतिहास; पाहा तो क्षण- VIDEO
प्रीती पालने रचला इतिहास, पॅरालिंपिकमध्ये 100 मीटर शर्यतीत मेडल जिंकणारी ठरली पहिली भारतीय
Paris paralympics 2024 : अवनी लेखरा कोण आहे? पॅरालिम्पिकमध्ये मिळवून दिलं पहिलं गोल्ड मेडल, महाराष्ट्रात का होतेय ट्रेंड?

प्रितीने महिलांच्या 100 मीटर (T35) स्पर्धेत पर्सनल बेस्ट टाईमिंग 14.21 सेकंदासह हे पदक जिंकलं. याच शर्यतीत चीनच्या झोऊ जियाने सुवर्णपदक जिंकले, तर गुओ कियानकियानने रौप्यपदक जिंकले. झोऊने 14.58 सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. तर गुओ हिने 13.74 सेकंदांचा वेळ घेतला.

प्रीतीचे कांस्यपदक पॅरिस पॅरालिम्पिकमधील पॅरा ॲथलेटिक्समधील भारताचे पहिले पदक आहे. पॅरालिंपिक खेळांमध्ये टी35 श्रेणी अशा पॅरा ॲथलीट्ससाठी आहे, ज्यांना हायपरटोनिया, ॲटॅक्सिया आणि एथेटोसिस आणि सेरेब्रल पाल्सी इत्यादी सारखे विकार आहेत.

दरम्यान, प्रीती पाल या वर्षाच्या सुरुवातीपासूनच जबरदस्त कामगिरी करत आहे. तिने मार्च 2024 मध्ये बेंगळुरू येथे झालेल्या 6व्या इंडियन ओपन पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 2 सुवर्ण पदके जिंकली होती. त्यानंतर तिने मे महिन्यात जपानमध्ये झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवून कांस्यपदक जिंकलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com