देशातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हालाही बँकेत नोकरी करायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदासाठी भरती सुरु आहे. या पदासाठी तुम्ही sbi.co.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतने अर्ज करु शकतात. या भरती प्रक्रियेत एकूण १४९७ रिक्त पदे आहेत. या पदांसाठी तुम्हीही अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०२४ आहे. (State Bank Of India Recruitment)
डेप्युटी मॅनेजर सिस्टीम - प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड डिलिव्हरी- १८७ पदे भरण्यात येणार आहे. इन्फ्रा सपोर्ट अँड क्लाउज ऑपरेशन डेप्युटी मॅनेजर पदासाठी ४१२ पदे, नेटवर्किंग ऑपरेशन डेप्युटी मॅनेजर पदासाठी ८० जागा भरण्यात येणार आहे. आयटी आर्किटेक्ट पदासाठी २७ जागा रिक्त आहे. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी पदासाठी ७ जागा रिक्त आहेत तर असिस्टंट मॅनेजर पदासाठी ७८२ जागांवर भरती करण्यात येणार आहे.
डेप्युटी मॅनेजर पदासाठी सर्वप्रथम उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल. त्यानंतर त्यांची मुलाखत घेतली जाईल. ही मुलाखत १०० अंकाची असेल. यानंतर मुलाखतीत पास झालेल्या उमेदवारांची निवड केली जाईल. मेरीट लिस्टनुसार उमेदवारांची नोकरीसाठी निवड केली जाईल.
असिस्टंट मॅनेजर पदासाठी ऑनलाइन टेस्ट आणि मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. ही परीक्षा नोव्हेंबर महिन्यात घेतली जाण्याची शक्यता असणार आहे. ही परीक्षा १०० गुणांची असणार आहे. या परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल.
या नोकरीसाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार आहे. हे पैसे तुम्ही ऑनलाइन पद्धतीने भरु शकतात. या नोकरीबाबत सर्व माहिती sbi.co.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.