JOB
JOBSaam Tv

Government Job: १०वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी;या सरकारी विभागात सुरु आहे भरती; महिन्याला मिळणार ६३००० पगार

Government Job: तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. विधी व न्याय विभागात ही भरती सुरु आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना ६३००० रुपये पगार मिळणार आहे.
Published on

तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. विधी व न्याय विभागात गट क मध्ये भरती सुरु आहे. या विभागात विविध पदांसाठी भरती सुरु आहे. या भरतीची जाहिरात विधी व न्याय विभाग, मंत्रालयाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये भरतीची सर्व माहिती देण्यात आली आहे.

विधी व न्याय विभागात वाहन चालक या पदासाठी भरती सुरु आहे. १०वी पास उमेदवारदेखील या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. फक्त उमेदवाराला वाहन चालवण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे.

JOB
NTPC Recruitment: महिन्याला २ लाख पगार, NTPC मध्ये 'या' पदासाठी भरती सुरु; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ही ६८ वर्ष असावी. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा. या नोकरीसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना १९,९०० ते ६३,२०० रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त शाळेतून माध्यमिक शिक्षण म्हणजे १० वी पास असणे गरजेचे आहे. त्याचसोबत उमेदवाराकडे वाहन चालवण्याचे लायसन्स असायला हवे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला तीन वर्षांचा वाहन चालवण्याचा अनुभव असायला हवा. २ रिक्त पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

JOB
Supreme Court Job: सुप्रीम कोर्टात नोकरीची संधी; १०वी पास तरुणांनो आजच करा अर्ज, जाणून घ्या सविस्तर

नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा वाचता येणे आवश्यक आहे. विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नोकरी करावी लागणार आहे.२० सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उप सचिव (प्रशासन), ३ रा मजला, विस्तार इमारत, विधीव न्याय विभाग, मंत्रालय ४०० ०३२ येथे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

JOB
Mazagaon Dock Job: माझगाव डॉकमध्ये नोकरी करा, महिन्याला ८३००० कमवा; कोणत्या पदासाठी भरती, पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com