Tata Motors: टाटा मोटर्समध्ये 300 पदांसाठी भरती; 'या' तारखेला होणार मुलाखत

QUESS CORP LTD द्वारे शनिवार, 24 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11:00 ते दुपारी 3:00 या वेळेत दोन कंपन्यांसाठी जॉब कॅम्प आयोजित करण्यात आलाय. यात म्हणून टाटा मोटर्स आणि भारत बायोटेक कंपनीसाठी प्रशिक्षणार्थी व्हिज्युअल इन्स्पेक्टर प्रोडक्शन पदासाठी मुलाखत घेतली जाणार आहे.
Tata Motors: टाटा मोटर्समध्ये 300 पदांसाठी भरती; 'या' तारखेला होणार मुलाखत
Published On

नोकरीच्या शोधार्थ असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. टाटा मोटर्स आणि भारत बायोटेक कंपनीत नोकरी मिळवण्याची संधी चालून आलीय. टाटा मोटर्स सारख्या कंपनीत काम करायचे असेल तर २४ ऑगस्ट रोजी श्रम संसाधन कार्यालय परिसरात आयोजित करण्यात आलेल्या जॉब कॅम्पला जाऊन नोकरी मिळवू शकता. येथे दोन कंपन्यांसाठी 300 पदांवर मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.

याबाबतची सविस्तर माहिती दरभंगा येथील प्रादेशिक नियोजन कार्यालयाचे सहाय्यक नियोजन अतिरिक्त संचालक यांनी दिलीय. QUESS CORP LTD तर्फे शनिवार, 24 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11:00 ते दुपारी 3:00 या वेळेत दोन कंपन्यांसाठी रोजगार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात टाटा मोटर्स आणि व्हिज्युअल इन्स्पेक्टर प्रोडक्शन (भारत बायोटेक) येथे प्रशिक्षणार्थीच्या एकूण 300 पदांवर नियुक्तीसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत.

शिक्षण : 12 वी /आयटीआय आणि डिप्लोमा उत्तीर्ण असणँ आवश्यक आहे.

पुरुष उमेदवार - वय 18 ते 28 वर्षे

उमेदवारांना काय लाभ मिळले

10000 ते 14000 रुपये प्रति महिना स्टायपेंड/पगार

बोनस आणि वैद्यकीय सुविधा

टाटा मोटर्सद्वारे 3 वर्षांच्या यशस्वी प्रशिक्षणानंतर मेकॅनिक इलेक्ट्रॉनिक्समधील डिप्लोमाचे प्रमाणपत्र दिलं जाणार आहे.

गुजरात आणि हैदराबादमध्ये प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळेल.

या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांना रोजगार कार्यालयात नोंदणी करावी लागेल. जे भारत सरकारच्या NCS पोर्टलवर देखील करता येईल. उमेदवारांना शैक्षणिक प्रमाणपत्रे, फोटो, आधार कार्ड, पॅनकार्ड आणि इतर प्रमाणपत्रांसह त्यांचा बायोडेटा घेऊन नोकरी शिबिरात सहभागी व्हावे लागेल. 24 ऑगस्ट रोजी लहेरियासराय आयटीआय जवळील रामनगर येथील संयुक्त श्रम भवन येथे या रोजगार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

Tata Motors: टाटा मोटर्समध्ये 300 पदांसाठी भरती; 'या' तारखेला होणार मुलाखत
IBPS PO Recruitment: नॅशनल बँकेत ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; IBPS PO साठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख; जाणून घ्या सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com