टाटा समूहाची दिग्गज कंपनी टाटा मोटर्सबाबत मोठी बातमी समोर आली आहे. टाटा मोटर्सच्या बोर्डाने सोमवारी कंपनीच्या व्यवसाय ऑपरेशन्सचे दोन युनिट्समध्ये विभाजन करण्यास मान्यता दिली आहे. कंपनी आगामी काळात प्रवासी वाहने आणि व्यावसायिक वाहन व्यवसाय वेगळे करणार आहे. या दोन्ही कंपन्या शेअर बाजारात लिस्ट होणार आहेत. यातच टाटा मोटर्सचा शेअर सोमवारी किरकोळ घसरणीसह 987.20 रुपयांवर बंद झाला.
टाटा मोटर्सचे सर्व भागधारक नव्याने लिस्टिंग झालेल्या दोन्ही कंपन्यांमध्ये समान भागभांडवल कायम ठेवतील. म्हणजेच ज्यांच्याकडे टाटा मोटर्सचे शेअर्स आहेत, त्यांना दोन्ही लिस्टिंग कंपन्यांमध्ये समान शेअर्स मिळतील. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कंपनीने म्हटले आहे की, विभागणीनंतर एक युनिट व्यावसायिक वाहनांचा व्यवसाय आणि संबंधित गुंतवणुकीवर लक्ष ठेवेल. दुसरी कंपनी इलेक्ट्रिक वाहने, जग्वार आणि लँड रोव्हर आणि संबंधित गुंतवणुकीसह प्रवासी वाहनांचा व्यवसाय हाताळेल. (Latest Marathi News)
टाटा मोटर्सने शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, संपूर्ण प्रक्रिया NCLT मार्फत केली जाईल. विभागणी प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 12 ते 15 महिने लागतील. टाटा मोटर्सची प्रवासी वाहने, व्यावसायिक वाहने आणि JLR व्यवसाय 2021 पासून वेगवेगळ्या सीईओद्वारे चालवले जात आहेत.
टाटा मोटर्सने म्हटले आहे की, विभागणीमुळे त्यांचे कर्मचारी, ग्राहक आणि व्यावसायिक भागीदारांवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांनी विभागणी बाबत बोलताना म्हटले आहे की, याद्वारे कंपन्या बाजारात सध्या असलेल्या संधींचा अधिक चांगला फायदा घेऊ शकतील.
दरम्यान, टाटा मोटर्ससाठी डिसेंबर तिमाही चांगली राहिली. या काळात कंपनीचा नफा १३३ टक्क्यांनी वाढून ७१०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचा महसूल २५ टक्क्यांनी वाढून १.११ लाख कोटी रुपये झाला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.