Nana Patole : ताकदीनिशी लढू, पराभूत करू; अशोक चव्हाणांच्या राजीनामान्यानंतर नाना पटोले नेमकं काय म्हणाले?

Nana Patole Latest News: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या सर्व घडामोडीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Nana Patole
Nana PatoleSaam tv
Published On

Nana Patole News:

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडमोडींना पुन्हा वेग आला आहे. या निवडणुकीआधीच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या सर्व घडामोडीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'एक्स' मीडियावर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले,'काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nana Patole
Sanjay Raut News: काँग्रेसवर दावा सांगून 'हात' मिळवणार का? अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊतांचा खोचक प्रहार!

'आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू, असे नाना पटोले पुढे म्हणाले.

Nana Patole
Ashok Chavan: अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसचे कोणते आमदार पक्ष सोडणार? 'ही' नावं आली समोर

विजय वडेट्टीवर यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनीही अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'अशोक चव्हाण यांचा राजीनामा धक्कादायक आहे. त्यांनी अचानक असा निर्णय का घेतला माहीत नाही. याबाबत माझ्याशी चर्चा झाली नाही. मी २००७ पासून त्यांच्याबरोबर काम केले आहे'.

'विजय वडेट्टीवार जातील अशी चर्चा होत आहे, पण त्यात तथ्य नाही, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com