नॅशनल बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. मोठ्या सरकारी बँकेत नोकरी करण्याची तुम्हाला सुवर्णसंधी आहे.आयबीपीएसद्वारे अनेक बँकामध्ये भरती केली जाणार आहे. आयबीपीएसद्वारे दरवर्षी ही भरती केली जाते. यावर्षीही ही भरतीप्रक्रिया राबवण्यात आली आहे. बँकेमध्ये ऑफिसर होण्यासाठी आयबीपीएस पीओ परीक्षा द्यावी लागते. याच परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी आज शेवटची तारीख आहे. (IBPS PO)
आयबीपीएस प्रोबेशनरी ऑफिसर भरतीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे.त्यामुळे ज्या उमेदवारांनी अजूनही अर्ज केले नाहीत त्यांनी लवकरात लवकर करावेत. आयबीपीएसद्वारे तब्बल ४,४५५ प्रोबेशनरी ऑफिसर पदांवर भरती केली जाणार आहे.
प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी भरती ही लेखी परीक्षेद्वारे केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांना दोन परीक्षा द्यावा लागतात. प्रीलियम आणि मुख्य परीक्षेद्ववारे ही भरती केली जाणार आहे. प्रीलियम परीक्षा १९ आणि २० ऑक्टोबर या कालावधीत होईल तर आयबीपीएस परीक्षा ३० नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. (IBPS PO Application Last Date)
या नोकरीसाठी २० ते ३० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. अर्ज करणाऱ्या व्यक्तीने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा शिक्षण संस्थेतून कोणत्याही क्षेत्रात पदवी प्राप्त केलेली असणे गरजेचे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.