SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी;विविध पदांसाठी सुरु आहे भरती;पात्रता आणि अर्ज कसा करायचा?

SBI Recruitment For Specialist Officer: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.
SBI Recruitment
SBI RecruitmentSaam Tv
Published On

SBI Bank Job Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी या नोकरीसाठी अर्ज करावेत. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. याबाबत सर्व माहिती बँकेच्या अधिकृत वेबसाउइटवर म्हणजे sbi.co.in वर जाऊन अर्ज करु शकतात. या साइटवर सर्व माहिती देण्यात आली आहे.

SBI Recruitment
SSC Recruitment: १२वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; कर्मचारी निवड आयोगाद्वारे 'या' पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या सविस्तर

या भरतीसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन/ पोस्ट ग्रॅज्युएशन/ पीजीडीएम/ एमई/ एमटेक/ बीई/ बीटेक पदवी प्राप्त करणे गरजेचे आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही वर्ष कामाचा अनुभव असावा.या नोकरीसाठी २३ ते ५० वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करावेत.

या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला स्टेट बँक इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.त्यानंतर न्य रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुमची आवश्यक माहिती भरा. ज्या उमेदवारांनी आधीच रजिस्ट्रेशन केले असेल त्यांन डायरेक्ट लिंकवर जाऊन अर्ज करावेत. या अर्जाची प्रिंट आउट तुमच्याजवळ ठेवावी.

SBI Recruitment
Government Job: तरुणांसाठी नोकरीची संधी; कर्मचारी राज्य विमा महामंडळात सुरू आहे भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

या नोकरीसाठी सामान्य, ओबीसी आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांना ७५० रुपये अर्ज शुल्क भरावा लागेल. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही.

याचसोबत सध्या नॅशनल बँकेतदेखील भरती सुरु आहे. लिपिक पदे ते ऑफिसर या पदांसाठी भरती सुरु आहे. आयबीपीएसद्वारे ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

SBI Recruitment
IBPS Recruitment: नॅशनल बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; IBPS द्वारे ५३५१ ऑफिसर पदांसाठी भरती;अर्ज कसा करायचा?जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com