IBPS Recruitment: नॅशनल बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; IBPS द्वारे ५३५१ ऑफिसर पदांसाठी भरती;अर्ज कसा करायचा?जाणून घ्या

IBPS PO/SO Recruitment: दरवर्षी IBPS द्वारे बँक स्पेशलिस्ट ऑफिसर आणि प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी परीक्षा घेण्यात येते. यावर्षी ५५३१ पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
IBPS Recruitment
IBPS RecruitmentSaam Tv
Published On

नॅशनल बँकेत नोकरी करायचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. आयबीपीएसद्वारे प्रोबेशनरी ऑफिसर आणि स्पेशलिस्ट पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी देशभरातील लाखो लोक अर्ज करतात. देशातील सर्वाजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये हजारो पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन द्वारे ही परीक्षा आयोजित केली जाते.

IBPS Recruitment
Government Job: १२ वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु आहे भरती;अर्ज कसा करायचा?जाणून घ्या सविस्तर

IBPS PO/SO परीक्षा 2024 CRP PO/MT XIV CRP आणि SRL-XIV परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया १ ऑगस्टपासून सुरु झाली आहे. IBPS ने एकूण ५३५१ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी अधिसूचना तुम्ही IBPS च्या अधिकृत वेबसाइचवर पाहू शकतात. यामध्ये CRP PO/MT XIV परीक्षेसाठी ४४५५ रिक्त जागा आहेत. तर CRP SPL-XIV साठी ८९६ पदांसाठी रिक्त जागा आहेत. या नोकरीसाठी परीक्षा घेण्यात येते.

IBPS परीक्षेद्वारे निवड झालेल्या उमेदवारांना बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब आणि सिंध बँक, युको बँक या बँकामध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.

IBPS Recruitment
Railway Recruitment 2024 : भारतीय रेल्वेत तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी, तब्बल १० हजार ८४४ जागांसाठी मेगाभरती, वयाची अट काय?

IBPS PO/SO परीक्षांसाठी सर्व माहिती ibps.in वर देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट आहे. IBPS PO/MT परीक्षेतील उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केली असणे आवश्यक आहे. IBPS SO पदासाठी रिक्त पदासंबंधित विषयात पदवी असणे आवश्यक आहे. २० ते ३० वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

IBPS Recruitment
IBPS PO Recruitment: बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; IBPS PO द्वारे ४४५५ पदे भरती केली जाणार; मिळणार ५० हजारांपेक्षा जास्त मासिक वेतन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com