JPSC भर्ती 2024 : पदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; वनविभागात अनेक पदांसाठी बंपर भरती, असा करा अर्ज

JPSC भर्ती 2024 : सध्याच्या तरुण वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सध्या पदवीधर तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे.
JPSC  भर्ती 2024
JPSC भर्ती 2024Saam Tv
Published On

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या प्रत्येक तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. झारखंड लोकसेवा आयोगाने भरती प्रक्रियेसंबंधित एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यानुसार राज्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या पदांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना या ' jpsc.gov.in 'अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज कराला लागेल. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही १० ऑगस्ट निश्चित करण्यात आलेली आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी, उमेदवार खाली दिलेल्या माहितीची मदत घेऊ शकतात.

JPSC  भर्ती 2024
Government Job: १२ वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु आहे भरती;अर्ज कसा करायचा?जाणून घ्या सविस्तर

झारखंड लोकसेवा आयोगामार्फत चालवण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेव्दारे साधारण १७० वन परिक्षेत्र अधिकारीसाठी पदे भरण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी पूर्वपरीक्षाही १८ ऑगस्ट रोजी निश्चित करण्यात आलेली आहे. या पदांसाठी परीक्षा सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत पार पडणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी उमेदवाराकडे कृषी (agriculture)अभियांत्रिकी ,पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय विज्ञान, वनशास्त्र, वनस्पतिशास्त्र , रसायनशास्त्र ,भूविज्ञान,गणित ,भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र यासारख्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान एका विषयाची पदवी आवश्यक आहे. विज्ञान आणि पर्यावरण विज्ञान शिवाय या संबंधित विषयांमध्ये ऑनर्स पदवी तसेच मेकॅनिकल तसेच केमिकल इंजिनीअरिंगमधील अभियांत्रिकी पदवी आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा (age limit)ही कमीत कमी २१ ते ३५ वर्ष असावी. तर अर्ज करणाऱ्या आरक्षित प्रवर्गातील प्रत्येक उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत काही सवलत दिली जाईल.

अर्ज आणि फी

या पदांसाठई अर्ज करणाऱ्या सामान्य तसेच ईबीसी , बीसी, ईडब्लूएस या श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुक्ल हे फक्त ६०० रुपये भरावे लागतील तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुक्ल हे १५० रुपये ठेवण्यात आलेले आहे.

जाणून घ्या अर्ज कसा करावा

उमेदवारांना अर्ज करण्यासाठी प्रथम उमेदवारांना अधिकृत वेबसाइट jpsc.gov.inवर जावे लागेल. यानंतर अर्जदार उमेदवारांना वेबसाइटच्या पहिल्या पेजवरील ऑनलाइन अर्ज ऑप्शनवर क्लिक करावे. मग या पेजवर गेल्यानंतर उमेदवांराना त्यांच्या नावाची नोंदणी आणि अर्ज करु शकता. त्यासाठी आवश्यक कायदपत्रे अपलोड करा. मग आवश्यक असलेली फी भरा. शेवटला फॉर्म(form)सबमिट करुन फॉर्म डाउनलोड करावा.तुमच्यासाठी या फॉर्मची आवश्यक एक प्रिंट आउट तुमच्या कडे ठेवावी.

JPSC  भर्ती 2024
Job Opportunity : होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रामध्ये काम करण्याची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com