Government Job: महाराष्ट्र कृषी विभागात नोकरीची सुवर्णसंधी;या पदासाठी सुरु आहे भरती; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Maharashtra Krushi Vibag Bharti: तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विभागात सध्या भरती सुरु आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करावेत.
Government Job
Government JobGoogle
Published On

महाराष्ट्र शासन कृषी विभागात भरती सुरु आहे. कृषी व पदुम विभाग, मुंबई येथे रिक्त पदे भरती केली जाणार आहे. कृषी विभागात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. कृषी विभागाद्वारे या नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Government Job
Bank Job: जिल्हा परिषद बँकेत नोकरीची सुवर्णसंधी;१० वी आणि १२ वी पास उमेदवार करु शकतात अर्ज;जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पुणे येथील विभागात तुम्हाला कामाची संधी आहे.

व्यवस्थापकीय संचालक या पदासाठी रिक्त पदे आहेत. या नोकरासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑगस्ट २०२४ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी त्याआधीच अर्ज करावेत.या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना शेतकरी उत्पादक कंपनी कक्षाची राज्यस्तरावर अंबलबजावणी करण्यासाठी मदत करायची आहे. महाराष्ट्र राज्यातील छोट्या शेतकऱ्यांच्या कृषी संघाचे कामकाज पाहावे लागणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज कृषी संचालक, आत्मा कृषी आयुक्तालय, साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे येथे अर्ज पाठवायचा आहे.

Government Job
Railway Recruitment: तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय रेल्वेत ७९३४ पदांसाठी मेगाभरती; अर्ज कुठे आणि कसा करायचा?जाणून घ्या

महाराष्ट्र कृषी विभागात नोकरी करायची असेल तर तुम्हाला शेतीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. शेतकरी संघाच्या समस्या समजून घेता येणे आवश्यक आहे. विविध गावातील शेतजमिनींचे ज्ञान असणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करता यायला हवे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर योग्य उपाय काढता यायला हवा.

Government Job
LIC Recruitment: LIC मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; २०० पदांसाठी भरती सुरू; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com