सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वेमध्ये मोठी भरती सुरु आहे. केंद्र शासनाच्या अंतर्गत ही भरती होणार आहे. रेल्वे विभागाकडून ही भरती राबवली जाणार आहे. लवकरच या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या.
रेल्वे विभागातील भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ज्युनिअर इंजिनियर या रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. एकूण ७९३४ जागांसाठी ही पदभरती होणार आहे. या नोकरीसाठी वयाची आणि शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात ३० जुलै २०२४ पासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०२४ असणार आहे.rrbapply.gov.in या अधिकृत साइटवर जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल.
या भरतीमध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर या पदासाठी भरती केली जाणार आहे. त्यामुळे संबंधित क्षेत्रात पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. १८ ते ३६ वयोगटातील उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतात.
या भरतीच्या अर्जासाठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांना ५०० रुपये फी भरावी लागणार आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना २५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.
याचसोबत सरकारी नोकरी करण्याची अजून एक सुवर्णसंधी आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीमध्ये नोकरीची संधी आहे. ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. २१ ते २८ वयोगटातील उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकणार आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.