Bank Job: जिल्हा परिषद बँकेत नोकरीची सुवर्णसंधी;१० वी आणि १२ वी पास उमेदवार करु शकतात अर्ज;जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर

District Co Operative Bank Recruitment : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरीची संधी आहे. १० वी आणि बारावी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या.
Bank Job
Bank JobSaam tv
Published On

बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ११८ पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. १० वी आणि १२ वी पास उमेदवारांना नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने याबाबत जाहिरात प्रकाशित केली आहे. तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन ही जाहीरात चेक करु शकतात.

Bank Job
Government Job in ED: ईडीची सायबर सुरक्षा वाढवण्यासाठी 42 पदांसाठी भरती; तब्बल ७५००० मिळणार पगार, आजच अर्ज करा

जिल्हा मध्यवर्ती बँकेत शिपाई आणि लिपिक ही पदे भरती केली जाणार आहेत. १० वी आणि १२ वी पास उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. ऑनलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज भरु शकतात. १८ ते ४० वयोगटातील उमेदवार शिपाई या पदासाठी अर्ज करु शकतात. तर २१ ते ४० वयोगटातील उमेदवार लिपिक पदासाठी अर्ज करु शकतात.

शिपाई पदासाठी उमेदवार १० वी पास असणे आवश्यक आहे. तर लिपिक पदासाठी उमेदवाराने पदवी प्राप्त केलेली असणे गरजेचे आहे. त्याचसोबत MSCIT किंवा इतर कॉम्प्युटर परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. भंडारा येथील शाखेसाठी ही भरती करण्यात येणार आहे.

Bank Job
LIC Recruitment: LIC मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; २०० पदांसाठी भरती सुरू; अर्ज कसा करायचा? जाणून घ्या

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने ८८५ रुपये शुल्क भरायचे आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवाराने ६५० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. उमेदवारांना ऑनलाइ परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहावे लागेल. ऑनलाइन परीक्षा भंडारा शहरातील केंद्रावर घेण्यात येईल. उमेदवारास मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला https://bhandaradccb.com/ किंवा https://bhandaradccb.in/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. २ ऑगस्ट २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Bank Job
IOCL Recruitment: कामाची बातमी! इंडियन ऑइलमध्ये 1 लाख रुपयांच्या पगाराची नोकरी, अर्ज कसा करायचा? वाचा सविस्तर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com