पूजा खेडकरने आचार्य अत्रेंच्या ‘तो मी नव्हेच’ या गाजलेल्या नाटकाची आठवण करुन दिलीये. कारण पूजानं यूपीएसीची परीक्षा देण्यासाठी 6 वेळा नावं बदलल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. बहुरूपी पूजा ही यूपीएससीतली लखोबा लोखंडेच ठरलीय. अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या यंत्रणांना गंडा घालणा-या पूजावरचा हा स्पेशल रिपोर्ट....
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून पुण्यात रुजू झाल्यानंतर पूजा खेडकरचे एक-एक कारनामे उघड होत गेले. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी सारख्या सनदी अधिकारी देणा-या सर्वोच्च संस्थेच्या डोळ्यातही पूजा खेडकरनं धूळ फेक केली. इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी यूपीएससीकडून ९ वेळा परीक्षा देण्याची मुभा असते. मात्र पूजानं आपल्या नावात तब्बल सहा वेळा बदल करून १२ वेळा परीक्षा देण्याचा कारनामा केला. UPSC परीक्षेचा फॉर्म भरताना स्वतःच्या नावाचं स्पेलिंग अनेकदा बदललं. कधी वडिलांच्या नावात तर कधी आईच्या नावात बदल करुन फॉर्म भरला. दिल्ली पोलिसांच्या तपासातून बहुरुपी पूजाची ही धक्कादायक माहिती समोर आलीये.
पूजानं सहा वेळा नावं कशी बदलली?
2012
खेडकर पूजा दिलीपराव
2018
पूजा दिलीप खेडकर
2019
आईच्या नावात बदल
बुधवंत मनोरमा जे
2021
पूजा मनोरमा दिलीप खेडकर
2022
वडिलांच्या नावात बदल
दिलीप के खेडकर
2023
आईच्या नावात बदल
मनोरमा बुधवंत
आयएएस अधिकारी ते थेट जेलमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या पूजानं गेल्या महिनाभरात काय काय प्रताप केले?
जुलैमध्ये पूजा खेडकरच्या वर्तवणुकीवर प्रश्नचिन्ह
8 जुलै - पूजा खेडकरची वाशिममध्ये बदली
11 जुलै - पुणे पोलिसांकडून पूजा खेडकरला नोटीस
16 जुलै - मसुरीतील प्रशिक्षण केंद्रात पूजा खेडकरला परत बोलावलं
19 जुलै - यूपीएससीकडून पूजा खेडकरविरोधात गुन्हा
31 जुलै - यूपीएससीकडून IASपद रद्द
1 ऑगस्ट - पटियाला हाऊस कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला
पूजानं यंत्रणांच्या डोळ्यात धूळफेक करून लाल दिवा मिळवला खरा...मात्र तो गाडीवर लावायची घाई झाली आणि पूजात गोत्यात आली. पूजान हीं छोटीशी चूक केली नसती तर तिचं बिंग फूटलंच नसतं. त्यामुळे पूजासारखे लखोबा लोखंडे बनून शासनाला आणि जनतेला गंडा घालणारे असे अजून किती अधिकारी लाल दिव्याच्या गाड्यांमध्ये तो-यात फिरत आहेत त्यांचाही पर्दाफाश करण्याची गरजे आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.