Job Vacancies 2024 : तरुणांनो तयारीला लागा! तब्बल 6 लाख रिक्त पदे भरण्यात येणार, कोणकोणत्या विभागात भरती? वाचा...

BPSC Vacancies 2024 : सध्या प्रत्येक तरुण सरकारी नोकरीच्या शोधात आहेत.तर ही बातमी तुमच्यासाठी येत्या काही दिवसांत लाखो पदांसाठी बंपर भरती सुरु करण्यात येणार आहे.
 BPSC Vacancies 2024
Job Vacancies 2024 Saam Tv
Published On

बिहार राज्यात येत्या काही दिवसात लाखो पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार,बिहार राज्यात येत्या काही दिवसात अनेक विभागात साधारण ४५ विभागात तब्बल ६.४ लाखांपेक्षा अधिक पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु होऊ शकते.

 BPSC Vacancies 2024
Government Job Vacancy 2024: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; २ लाख रुपये मासिक वेतन मिळणार; जाणून घ्या सविस्तर

मीडिया रिपोर्टनुसार,बिहार सरकार येत्या काही दिवसांत अनेक पदांसाठी लाखो पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्याच्या तयारीत आहेत. एकूण पंचेचाळीस विभागात सहा लाखांहून अधिक सरकारी नोकऱ्यांची घोषणा करु शकतात.या नोकरी शोधणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर सतत लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे

BPSC च्या माध्यमातू समाजकल्याण आणि शिक्षण(Education) ,आरोग्य विभाग ,गृह विभाग शिवाय पंचायती राज या ४५ विभागात भरती प्रक्रिया करण्याची घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण भरती प्रक्रियेची अधिकृत माहिती अद्याप जारी करण्यात आलेली नाही. मात्र अहवालानुसार संपूर्ण भरती प्रक्रिया लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.

कोणत्या विभागात किती जागा असतील...?

येत्या काही दिवसांत भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे त्यासाठी कोणत्या )विभागात(department किती जागा असतील ते पुढील प्रमाणे पाहूयात.

शिक्षण विभाग: २,१७,५९१

समाज कल्याण विभाग: १,८४,०००

आरोग्य विभाग: ६५,७३४

गृह विभाग: ४१,४१४

महसूल आणि जमीन सुधारणा विभाग: १५,२१४

जलसंपदा विभाग : १३,७१२

ग्रामीण(rural )विकास विभाग: ११,७८४

लघु जलसंपदा विभाग: ७,५४८

परिवहन विभाग: ७,५२१

SC/ST कल्‌याण विभाग: ७,१६३

विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षण विभाग: ६,६८८

अन्न आणि ग्राहक संरक्षण विभाग: ६,२६१

ऊर्जा विभाग: ५,५६३

पंचायती राज विभाग: ५,५५१

कामगार संसाधन विभाग: ५,०३९

प्राणी आणि मत्स्यसंपत्ती विभाग:४,८१४

सामान्य प्रशासन विभाग : ३,८४५

इमारत बांधकाम विभाग: ३,८२८

नियोजन आणि विकास विभाग: ३,१२८

कृषी विभाग: ३,०१५

 BPSC Vacancies 2024
Job Vacancies : जॉब मार्केटमध्ये फ्रेशर्ससाठी मोठ्या संधी, नेमणुकीत ६ टक्के वाढ; Team Lease EdTechच्या रिपोर्टमधून स्पष्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com