Job Vacancies : जॉब मार्केटमध्ये फ्रेशर्ससाठी मोठ्या संधी, नेमणुकीत ६ टक्के वाढ; Team Lease EdTechच्या रिपोर्टमधून स्पष्ट

Team Lease EdTech Report : टीमलीज एडटेक या भारताच्या आघाडीच्या अध्ययन आणि रोजगारक्षमता उपाययोजना पुरवठादाराने आपला व्यापक करियर आऊटलुक रिपोर्ट एचवाय१ (जानेवारी- जून २०२४) सादर केला आहे. भारतात फ्रेशर्सच्या नेमणुकीत २०२४ मधील पहिल्या सहामाहीत २०२३ मधील पहिल्या सहामाहीच्या तुलनेत ६ टक्के वाढ झाली आहे.
Job Vacancies
Job VacanciesSaam Digital
Published On

Job Vacancies

टीमलीज एडटेक या भारताच्या आघाडीच्या अध्ययन आणि रोजगारक्षमता उपाययोजना पुरवठादाराने आपला व्यापक करियर आऊटलुक रिपोर्ट एचवाय१ (जानेवारी- जून २०२४) सादर केला आहे. या रिपोर्टमध्ये फ्रेशर्ससाठीच्या जॉब मार्केटबाबत काही महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. भारतात फ्रेशर्सच्या नेमणुकीत २०२४ मधील पहिल्या सहामाहीत २०२३ मधील पहिल्या सहामाहीच्या तुलनेत ६ टक्के वाढ झाली आहे (६२ टक्के विरूद्ध ६८ टक्के). त्याचबरोबर नोकरी शोधणाऱ्यांच्या सर्व श्रेणींमध्ये फ्रेशर्सच्या नेमणुकीकडे ७९.३ टक्क्यांपर्यंत कल वाढला आहे. अशी शाश्वत वाढ म्हणजे फ्रेशर्ससाठी आगामी महिन्यांमध्ये सकारात्मक जॉब मार्केट ठरेल, असा विश्वास आहे.

या अहवालानुसार फ्रेशर्सच्या नेमणुकीसाठी सर्वांत जास्त नेमणुकीकडे कल असलेल्या तीन उद्योगांमध्ये ई- कॉमर्स आणि टेक्नॉलॉजी स्टार्टअप (५५ टक्के), इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर (५३टक्के) आणि टेलिकम्युनिकेशन्स (५० टक्के) यांचा समावेश आहे. आयटी उद्योगात सीओआर एच२ २०२३ च्या तुलनेत फ्रेशर्सच्या नेमणुकीत एकूणच घट झाल्याचे (एचवाय १ २०२४ मध्ये ४२% तर एचवाय२ २०२३ मध्ये ४९%) दिसते. त्याचबरोबर मीडिया आणि मनोरंजनासारख्या क्षेत्रांत ३ टक्के घट झाली असून ट्रॅव्हल आणि हॉस्पिटेलिटी क्षेत्रात ४ टक्के वाढ झाली आहे (एचवाय१ २०२४ विरूद्ध एचवाय२ २०२३).

ग्राफिक डिझायनर, लीगल असोसिएट, केमिकल इंजिनीअर आणि डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह यांच्यासारख्या पदांसाठी फ्रेशर्ससाठी मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. बंगळुरू हे शहर ६९ टक्के नेमणुकीच्या कलाद्वारे आघाडीवर असून त्यापाठोपाठ मुंबई ५८ टक्के आणि चेन्नई ५१ टक्क्यांवर आहे. दिल्लीमध्ये हा कल ४५ टक्के असून एच२ २०२३ च्या तुलनेत येथे २ टक्के वाढ झाली आहे. तथापि, नवीन टॅलेंटसाठी मागणी सध्या ६८ टक्के असून चालू एचवाय१ साठी एचवाय२ च्या तुलनेत (जुलै- डिसेंबर २०२३) ३ टक्के थोडीशी वाढ (जानेवारी-जून २०२४) झाल्याचे दिसते.

Job Vacancies
Senior Citizens Schemes: ज्येष्ठ नागरिकांसाठी कर वाचवण्यासाठी FD सर्वात सुरक्षित पर्याय, फक्त 'अशी' गुंतवणूक करा

यावेळी हा अहवाल जनरेटिव्ह एआय च्या फ्रेशर्स जॉब मार्केटवरील प्रभावाबाबत देखील चर्चा करतो. त्यातून पूर्णपणे जागा घेण्याऐवजी नोकऱ्या मानवी-ए आय समन्वयाद्वारे बदलू लागल्‍या आहेत, असे मत मांडले गेले आहे. महत्त्वाचे म्हणजे सातत्यपूर्ण शिक्षण आणि समन्वय या गोष्टींद्वारे फ्रेशर्स जनरेटिव्ह एआयच्या मदतीने तांत्रिक सुधारणेच्या युगात प्रवेश करत आहेत. सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, तांत्रिक लेखक, कायदेशीर सहाय्यक, मार्केट रिसर्च अॅनालिस्ट आणि ग्राफिक डिझायनर्स यांच्यासारख्या जबाबदाऱ्या बदलतील, असे अपेक्षित आहे. फ्रेशर्सनी आपल्या कौशल्यात सातत्याने वाढ करून सुसंगत राहून या क्षमतेचा वापर करण्यासाठी जनरेटिव्ह एआयसोबत काम करण्यासाठी तयार राहिले पाहिजे. या सर्वेक्षणात भारतभरातील १८ उद्योगांमधील ५२६ लहान, मध्यम आणि मोठ्या कंपन्यांना समाविष्ट केले आहे. ही व्याप्ती १४ भौगोलिक प्रदेशांमध्ये पसरलेली आहे (महानगरे, टायर१ आणि टायर २) आणि ती नेमणूकीच्या भावनांवर प्रतिबिंबित होते.

टीमलीज एडटेक चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू रूज म्हणाले की, “आतापर्यंत कंपन्यांनी काही काळ जुन्या पद्धतीने विचार केला. त्याचबरोबर जागतिक मंदीच्या कालावधीत नेमणूकांचा वेग कमी झाला. परंतु आमच्या अलीकडच्या अहवालातून भारताच्या प्रगतीत कंपन्यांचा आत्मविश्वास दिसून येतो. कंपन्या आपल्या भविष्यातील मार्गाबाबत आत्मविश्वास बाळगून आहेत. ही गोष्ट त्यांच्या नवीन लोकांना नेमून त्यांचा टॅलेंट पूल मजबूत करण्यातील आत्मविश्वासातून दिसते.”

टीमलीज एडटेक च्या सह-संस्थापिका आणि अध्यक्षा नीती शर्मा म्हणाल्या की, “उत्पादन, अभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधा तसेच बांधकाम आणि रिअल स्टेट असे उद्योग सर्वाधिक सुयोग्य टॅलेंटच्या शोधासाठी एप्रेंटिसशिपला प्राधान्य देत आहेत हे पाहणे खूप गंमतीचा भाग आहे. डिग्री अप्रेंटिसशिपच्या सहाय्याने कंपन्या कौशल्यातील अंतर भरून काढू शकतात, स्पेशलाइज्ड टॅलेंटला पोषण देऊ शकतात आणि उद्योगाच्या अचूक गरजांनुसार आपल्या टॅलेंटला मजबूत करू शकतात. हे अप्रेंटिससाठी महत्त्वाचे ठरते कारण ते एकाच वेळी शिकू आणि कमवू शकतात, शैक्षणिक ज्ञान आणि प्रात्यक्षिक कामाचा अनुभव मिळवू शकतात आणि त्याद्वारे रोजगारक्षम बनू शकतात."

Job Vacancies
PM Yashasvi Yojana: पीएम यशस्वी योजना म्हणजे काय? जाणून घ्या पात्रतेचे निकष

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com