PM Yashasvi Yojana: पीएम यशस्वी योजना म्हणजे काय? जाणून घ्या पात्रतेचे निकष

PM Yashasvi Yojana Maharashtra: आजही आपल्या देशात विद्यार्थी आहेत, जे आर्थिक दुर्बलतेमुळे आपलं शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. त्यांच्यासाठी भारत सरकारने पीएम यशस्वी योजना सुरू केली आहे.
PM Yashasvi Yojana
PM Yashasvi YojanaYandex
Published On

PM Yashasvi Yojana Eligibility Criteria

भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी पीएम यशस्वी योजना (PM Yashasvi Yojana) योजना तयार केली आहे. या योजनेतंर्गत शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी आणि अभ्यासासाठी आवश्यक असलेली संसाधने प्रदान केली जातात. (marathi news)

ही शिष्यवृत्ती ओबीसी, भटक्या विमुक्त आणि अर्ध-भटक्या जमाती आणि डीएनटीसाठी मर्यादित आहे. ही शिष्यवृत्ती फक्त भारतीय विद्यार्थ्यांनाच दिली (PM Yashasvi Yojana Maharashtra) जाते. पीएम यशस्वी योजनेचे पात्रता निकष काय आहे, या योजनेची उद्दिष्टे काय (PM Yashasvi Yojana Eligibility Criteria) आहेत, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या. विद्यार्थ्यांना आर्थिक मदत रु. 75,000 ते रु. 1,25,000 पर्यंत दिली जाते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पीएम यशस्वी योजनेचे पात्रता निकष

  • अर्जदाराचे भारतात कायमस्वरूपी निवासस्थान असणे आवश्यक आहे.

  • उमेदवाराने OBC/EBC/DNT SAR/NT/SNT श्रेणीमध्ये येणे आवश्यक

  • दहावीच्या परीक्षेला बसण्यासाठी अर्जदारांनी आठवी इयत्ता पूर्ण केलेली असावी.

  • अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावं.

  • नवव्या वर्गासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जन्म 1 एप्रिल 2004 आणि 31 मार्च 2008 दरम्यान झालेला असावा.

  • अकरावी इयत्तेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जन्म 1 एप्रिल 2004 ते 31 मार्च 2008 दरम्यान झालेला असावा.

PM Yashasvi Yojana
PM Kisan Yojana: आनंदाची बातमी! PM किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याचे पैसे या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा

पीएम यशस्वी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • उमेदवाराचे 10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा 8वी उत्तीर्ण प्रमाणपत्र

  • उमेदवाराचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र

  • उमेदवाराचे ओळखपत्र.

  • ईमेल पत्ता आणि सेलफोन नंबर.

  • उमेदवाराकडे खालीलपैकी किमान एक क्रेडेन्शियल असणे आवश्यक आहे

  • अनुक्रमे OBC/EBC/DNT SAR/NT/SNT साठी प्रमाणपत्रे.

PM Yashasvi Yojana
Kanya Sumangala Yojana : नुकत्याच जन्मलेल्या मुलींना सरकार देणार २५००० रुपये, कोणाला आणि कसा मिळणार लाभ?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com