Kanya Sumangala Yojana : नुकत्याच जन्मलेल्या मुलींना सरकार देणार २५००० रुपये, कोणाला आणि कसा मिळणार लाभ?

Kanya Sumangala Yojana: मुलींच्या उत्तम भविष्यासाठी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारकडून नवनवीन योजना राबवण्यात येतात. त्याअंतर्गत मुलींना आर्थिक मदत करतात.
Government Schemes For Girls
Government Schemes For GirlsSaam Tv
Published On

Kanya Sumangala Yojana Registration:

मुलींच्या उत्तम भविष्यासाठी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारकडून नवनवीन योजना राबवण्यात येतात. त्याअंतर्गत मुलींना आर्थिक मदत करतात. या योजनांअतर्गत सरकार मुलींना शैक्षणिक मदत, लग्नासाठी आर्थिक मदत करतात. अशीच एक योजना म्हणजे कन्या सुमंगला योजना.

उत्तर प्रदेश सरकारने कन्या सुमंगला योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत मुलींना पूर्वी १५ हजार रुपये दिले जात होते. ते पैसे आता वाढवून २५ हजार करण्यात आले आहेत. (Latest news)

या योजनेच्या माध्यमातून सरकार राज्यातील आर्थि दुर्बल घटकातील मुलींना जन्मापासून ते पदवी शिक्षणापर्यंत आर्थिक मदत करतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइट sky.up.gov.in ला भेट द्यावी लागेल. मुलींना समाजात योग्य स्थान मिळावे यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.

कन्या सुमंगला योजना

कन्या सुमंगला योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी उत्तर प्रदेशची रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र असायला हवे. रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, विजेचे किंवा टेलिफोन बिल हे रहिवासी प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरले जाईल. कुटुंबाचे उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. कुटुंबातील जास्तीत जास्त २ मुलींच्या नावे खाते उघडता येईल. ज्या मुलींचा जन्म १ एप्रिल २०१९ ला किंवा त्यानंतर झाला आहे. त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मापासून ते त्यांच्या लग्नापर्यंत संपूर्ण खर्च सरकार उचलते.

Government Schemes For Girls
Schemes for Womens: महिलांसाठी मोदी सरकारच्या ४ जबरदस्त योजना; घरबसल्या कमावू शकता लाखो रुपये, जाणून घ्या कसे?

कन्या सुमंगला योजनेसाठी अर्ज कसा करावा?

कन्या सुमंगला योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम sky.up.gov या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर सिटिझन सर्व्हिस पोर्टलच्या होमपेजवर क्लिक करा. त्यानंतर एक फॉर्म ओपन होईल. त्यात आपली संपूर्ण माहिती भरावी. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन फॉर्म सबमिट करा.

Edited By-Siddhi Hande

Government Schemes For Girls
हाय टेक सेफ्टी फीचर्स, 6 एअरबॅग्ज आणि ADAS सिस्टीमसह Kia Sonet facelift लाँच; जाणून घ्या किंमत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com