Dhule Fraud Case : बनावट कागदपत्रे करून प्रॉपर्टी विक्री; टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी घेतले ताब्यात

Dhule News : देवपूर परिसरातील तक्रारदार यांची जमीन संबंधितांनी बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर विक्री केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता
Dhule Fraud Case
Dhule Fraud CaseSaam tv
Published On

धुळे : धुळे शहरात बनावट कागदपत्रे तयार करून प्लॉट खरेदी विक्रीचा काळाबाजार सुरु होता. हा प्रकार करणारी टोळी सक्रिय झाली होती. परंतु (Dhule) धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने हा प्रकार (Police) उघडकीस आणला असून यासंदर्भात पथकाने दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Maharashtra News)

Dhule Fraud Case
Beed News : दुध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक; रस्त्यावर दूध ओतून बीड- परळी महामार्ग अडवला

धुळे शहरातील देवपूर परिसरातील तक्रारदार यांची जमीन संबंधितांनी बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर विक्री केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या नंतर संबंधित तक्रारदारांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (Dhule LCB) पथकास यासंदर्भातील माहिती व तक्रार दिली. त्यावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदर टोळीचा पर्दाफाश करत या टोळीतील दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Dhule Fraud Case
Nashik News : तीन महिन्यांपासून फरार ड्रग्ज माफिया ताब्यात; गुंडा विरोधी पथकाने भोपाळमधून घेतले ताब्यात

टोळीच होती सक्रिय 

दरम्यान संबंधितांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस तपासात या टोळीने बनावट कागदपत्रे तयार करून ही खरेदी केली असल्याचे उघडकीस आले. याबाबतचा पुढील तपास करत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातर्फे आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का याबाबत तपस करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com