Sukanya Samiuddhi Yojana: मुलीचं भविष्य करा सुरक्षित; वर्षाला १.५० लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ७० लाख

Sukanya Samriddhi Yojana: केंद्र सरकारची मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना आहे. ही योजना मुलींचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी राबवण्यात आली आहे. या योजनेत तुम्हाला गुंतवणूकीवर चांगला परतावा मिळणार आहे.
Sukanya Samruddhi Yojana
Sukanya Samruddhi YojanaSaam Tv
Published On

Sukanya Samriddhi Yojana Benefit Get 3 Times High Interest:

सरकार नागरिकांच्या हितासाठी नेहमी नवनवीन योजना राबवत असतात. केंद्र सरकारची मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना आहे. ही योजना मुलींचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी राबवण्यात आली आहे. मुलींच्या लग्नाचा आणि उच्च शिक्षणाचा खर्च या योजनेतून केला जाऊ शकतो.

सरकारच्या सुकन्या समृ्द्धी योजनेवरील व्याजदरदेखील वाढवण्यात आले आहे. केंद्र सरकारने जानेवारी ते मार्च या तिमाहीसाठी योजनेवरील व्याज ८ टक्क्यांहून ८.२ टक्के केले आहे. (Latest News)

या योजनेअंतर्गत १० वर्षांच्या मुलीचे बँक खाते किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता. या खात्यात तुम्ही वर्षाला २५० रुपये ते १. ५ लाख रुपये गुंतवू शकता. या योजनेत तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत जमा रकमेवर सूटदेखील मिळते.

दरवर्षी १.५० लाख रुपये गुंतवा अन् ७० लाख रुपये मिळवा

सुकन्या समृद्धी योजना ही सर्वाधिक व्याज देते. या योजनेत वार्षिक ८.२ टक्के व्याज मिळते. या योजनेत तुम्ही दरवर्षी १.५ लाख रुपये गुंतवल्या मॅच्युरिटीवर ७० लाख रुपये मिळू शकतात. ही रक्कम तुमच्या गुंतवणूकीच्या रक्कमेच्या तीनपट जास्त असेल. या योजनेत तुम्ही कमीत कमी २५० रुपये तर जास्तीत जास्त १.५० लाख रुपये जमा करु शकतात. सुकन्या समृद्धी योजनेत १० वर्षांखालील मुलींचे खाते उघडता येते. योजनेत कुटुंबातील जास्तीत जास्त २ मुलींचे खाते उघडले जाईल.

Sukanya Samruddhi Yojana
Government Job Recruitements: सरकारी नोकरीची संधी; यूनियन बँक, MahaTranscoc मध्ये ७३६ जागांसाठी भरती

सुकन्या समृद्धी योजना ही करमु्क्त योजना आहे. या योजनेत तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत १.५० लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणूकीवर सूट मिळते. या योजनेतून मिळणाऱ्या रिटर्नवर कोणताही कर द्यावा लागत नाही. मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम ही करमुक्त असते.

या योजनेची मॅच्युरिटी २१ वर्ष आहे. मुलीचे वय २१ झाल्यानंतर तुम्ही पैसे काढू शकतात. तसेच मुलगी १८ वर्षाची झाल्यावर तुम्ही ५० टक्के रक्कम काढू शकता.

Sukanya Samruddhi Yojana
हिरोची जबरदस्त Hero Mavrick 440 लाँच; ग्राहकांसाठी कंपनीची स्पेशल ऑफर; जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com