देशातील दुचाकी उत्पादक कंपनी Hero MotoCorp ने नुकतीच Hero Marverick 440 बाईक लाँच केली आहे. जयपूरमधील Hero World कार्यक्रमात ही बाईक लाँच करण्यात आली आहे. ही बाईक Harley Davidson आणि Hero MotoCorp ने निर्मित केलेल्या Harley X440 वर आधारित आहे.
आकर्षक लूक आणि पॉवरफुल इंजिनसह ही बाईक लाँच करण्यात आली आहे. या बाईकची किंमत १.९९ लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची किंमत २.२४ लाख रुपये आहे. Hero MotoCorp ची ही बाईक Harley Davison x4440 च्या तुलनेत स्वस्त आहे. (Latest News)
कंपनीच्या या कारचे अधिकृत बुकिंगही सुरु झाले आहे. ग्राहक वेबसाइट किंवा डिलरशिपद्वारे ही बाईक बुक करु शकता. एप्रिल महिन्यापासून Hero Marvrick 440 ची डिलिव्हरी सुरु करणार आहे.
Marverick 440 मध्ये इलेक्ट्रिक फ्लूएल इंजेक्शनसह एअर कूल्ड ऑइल कूल्ड 2V सिंगल सिलेंडर 440cc 'Torqx' इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 6000 rpm आणि 4000 rpmवर आधारित आहे. ही कार 27bhp आणि 36NM टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड ट्रान्समिशन, स्लिप अँड असिस्ट क्लचसह येते. हे नवीन डिझाइन स्टील रेडियल पॅटर्न टायर्सशी जोडलेले आहे.
ग्राहकांसाठी Hero MotoCorp ने 'Welcome TO Maverick Club Offer' मध्ये ही कार लाँच केली आहे. जे ग्राहक १५ मार्चपूर्वी Marverick 440 बाईक बुक करतील त्यांना १० हजार रुपयांच्या अॅक्सेसरीज आणि प्रिमियम Marverick किट मिळेल. जे ग्राहक सर्वात आधी बाईक बुक करतील त्यांना ही ऑफर मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.