Redmi Buds 5 Price: दमदार साऊंडवाले Xiaomiचे Redmi Buds 5 लॉन्च; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

Redmi Buds 5 Features and Price: शाओमीने आपल्या TWS Earbudsच्या पोर्टफोलियाचा विस्तार करत भारतात नवीन प्रोडक्ट लॉन्च केले आहे. या प्रोडक्टचं नाव रेडमी बड्स ५ असं आहे. कंपनीने या प्रोडक्टला #SuperBuds टॅगलाइनने लॉन्च केले आहे. कंपनीने या प्रोडक्टमध्ये अनेक फीचर्स दिले आहेत.
Redmi Buds 5 Launched in India
Redmi Buds 5 Launched in IndiaXiaomi
Published On

Xiaomi Redmi Buds 5 Launch:

Xiaomi ने भारतीय बाजारपेठेत आपले नवीन उत्पादन आणले आहे. या उत्पादनाची माहिती घेऊन अनेकांना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. शाओमीने भारतात Redmi Buds 5 लॉन्च केले आहेत. हे एक TWS Earbuds आहेत. या उत्पादनाचे फीचर्स भारी असून अनेक ग्राहकांना हे एअरफोन आवडतील यात शंका नाही.(Latest News)

दरम्यान या एअरबड्समध्ये 6dB Active Noise Cancellationचे फीचर देण्यात आलंय. यात तीन मोड्सचा समावेश आहे. जर तुम्ही हे एअरबर्ड घेणार असाल तर तुम्हाला एका ऑफरचा लाभ मिळणार आहे. या उत्पादनावर ५०० रुपायांची ऑफर मिळत आहे. शाओमीने आपल्या TWS Earbudsच्या पोर्टफोलियाचा विस्तार करत भारतात नवीन प्रोडक्ट लॉन्च केले आहे. या प्रोडक्टचं नाव रेडमी बड्स ५ असं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कंपनीने या प्रोडक्टला #SuperBuds टॅगलाइनने लॉन्च केले आहे. कंपनीने या प्रोडक्टमध्ये अनेक फीचर्स दिले आहेत. Redmi Buds 5 मध्ये 46dB Active Noise Cancellationचं फीचर देण्यात आले आहे. या फीचरमध्ये तीन मोड देण्यात आले आहेत. यातून एअरफोन वापरताना आपल्याला आसपासचा काय होत आहे याची माहिती देते. शाओमी कंपनीच्या दाव्यानुसार, या एअरफोनची बॅटरी तब्बल ३८ तासांपर्यंत टिकते. विशेष म्हणजे हे एअरफोन्स फास्ट चार्ज होतात.

अवघ्या ५ मिनीट चार्ज केले तरी २ तास आपण गाणे ऐकण्याचा आनंद घेऊ शकतात. हे एअरफोन्स तीन रंगात लॉन्च करण्यात आले आहेत. Fusion Purple, Fusion Black आणि Fusion Whiteया तीन रंगात हे एअरफोन्स मिळतील.

कसा मिळेल ऑफरचा लाभ किती आहे किंमत

Redmi Buds 5 ची किंमत फक्त २,९९९ रुपये आहे. याची विक्री २० फेब्रवारीपासून सुरू होईल. हे एअरफोन्स Mi.com, Amazon.in, Flipkart, Mi Homes, आणि Xiaomiच्या रिटेल पार्टनरकडून खरेदी करू शकाल. हे एअरफोन्स Redmi Note 13 Seriesच्या स्मार्टफोन किंवा शाओमी आणि Redmi Pad सोबत घेतल्यास ग्राहकांना ५०० रुपयांचा फायदा होणार आहे.

ग्राहकांना ५०० रुपयांची सूट मिळणार आहे. Redmi Buds 5 मध्ये Dual-Mic म्हणजेच दोन माईकसह एआय व्हाइस AI Voice Enhancement चं फीचर देण्यात आले आहे. यात 12.4mm Dynamic Titanium Drivers वापर करण्यात आलाय. सर्व फ्रीक्वेंसीमध्ये हे एअरफोन्स चांगली साउंड क्लॉलिट देत असते. Redmi Buds 5मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth 5.3 आणि गुगलशी लवकर जुडत असून एक उत्तमप्रतीचे साऊंड अनुभव मिळत असतो.

Redmi Buds 5 Launched in India
Online Scam: मोबाईलमधील 'या' पाच अ‍ॅप्सला लगेच दाखवा डिलीटचा रस्ता; नाहीतर तुमच्या पैशांवर मारतील डल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com