शेतकऱ्यांना (Farmer)आर्थिक मदत करण्यासाठी सरकारने पाच महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावं आणि त्यांना मदत व्हावी, यासाठी सरकारी योजना सुरू केल्या आहेत. या योजनांच्या मदतीने सिंचनापासून ते आर्थिक मदतीपर्यंत सर्व काही दिलं जाते. (Latest Marathi News)
प्रधानमंत्री किसान सिंचन योजना
सिंचनाशी संबंधित एक मोठी समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक शेताला पाणी पुरवठा करणं, हा उद्देश (Government Schemes) आहे. स्त्रोत निर्मिती, तपशील, फलक, फील्ड ॲप्लिकेशन आणि विकास सराव यावर एंड-टू-एंड व्यवस्थेसह शेतकऱ्यांसाठी आकर्षक पद्धतीने प्रति ड्रॉप अधिक पीक मिळविण्याचे सरकारने ठरवले आहे. यासाठी आवश्यक ती मदत सरकारकडून पुरवली जाते.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पंतप्रधान पीक विमा योजना
पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडून पीक विमा योजना सुरू केली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न करण्यात आला (Government Schemes Benefit) आहे. आपत्ती, कीड किंवा दुष्काळामुळे पिकांचे नुकसान झाल्यास विमा योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाते.
परंपरागत कृषी विकास योजना (PKVY)
केंद्र सरकारच्या या योजनेंतर्गत भारत सरकार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करते. सेंद्रिय उत्पादनामध्ये, सेंद्रिय प्रक्रिया, प्रमाणन, लेबलिंग, पॅकेजिंग आणि वाहतूक यासाठी दर तीन वर्षांनी मदत दिली जाते. या योजनेतून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. तसेच सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन (Farmer Government Schemes Benefit) मिळते.
किसान क्रेडिट कार्ड
किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना केंद्र सरकारने 1998 मध्ये सुरू केली होती. शेतकऱ्यांना शेतीसाठी किंवा शेतीवरील खर्चासाठी पुरेसे कर्ज उपलब्ध करून देणे हा, या योजनेचा उद्देश (Farmer Government Schemes) होता. या योजनेतंर्गत भारत सरकार शेतकऱ्यांना कृषी कर्जासाठी वार्षिक 4 टक्के सवलतीच्या दराने शेतीसाठी सरकारी अनुदानाच्या स्वरूपात मदत करते. आतापर्यंत अडीच कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. ती शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये देते. देशातील कोणताही शेतकरी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते, जी 4 महिन्यांच्या अंतराने दिली (Schemes For Farmer) जाते. अधिकृत वेबसाइटद्वारे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येतो
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.