Ghati Hospital : घाटीचा बालरोग विभाग फुल्ल; ९६ खाटांवर ९७ मुले उपचारासाठी दाखल, डेंग्यू सदृश्य आजराचेही रुग्ण

Sambhajinagar News : प्रामुख्याने लहान मुलांमध्ये गॅस्ट्रो, व्हायरल फिव्हर आणि डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण सर्वाधिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं
Ghati Hospital
Ghati HospitalSaam tv
Published On

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण व अधून मधून रिमझिम पाऊस होत आहे. या बदललेल्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, ताप यासारखे साथीचे आजार पसरण्यास सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील बालरोग विभागाचा वॉर्ड सध्या बालरुग्णांनी भरून गेला आहे. बालरोग विभागातील ९६ खाटांवर ९७ मुले हे उपचार घेत आहेत. 

Ghati Hospital
Gadchiroli Heavy Rain : चौथ्या दिवशीही गडचिरोलीत पूर परिस्थिती कायम; तीन राष्ट्रीय महामार्गासह २३ प्रमुख मार्ग बंदच

पावसाळ्यात उद्भवणारे साथीचे आजार आता डोके वर काढत असून (sambhajinagar) संभाजीनगर शहरात साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. प्रामुख्याने लहान मुलांमध्ये गॅस्ट्रो, व्हायरल फिव्हर आणि डेंग्यू सदृश्य आजाराचे रुग्ण सर्वाधिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदलामुळे सर्दी, ताप आणि खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. या आजारांचा विळखा ज्येष्ठ आणि लहान मुलांना सर्वाधिक पडत आहे. त्याचबरोबर (Ghati Hospital) घाटीतील बालरोग विभागाची ओपीडी शंभरच्या वर गेली आहे. घाटी रुग्णालयात दाखल बालकांनी वार्ड फुल्ल झाला आहे. 

Ghati Hospital
Nandurbar News : धबधब्याच्या वाहत्या प्रवाहात जाऊन तरुणांची स्टंटबाजी

डेंग्यूने दोघांचा मृत्यू 

संभाजीनगर शहरात आतापर्यंत डेंगी संशयित २ मुलांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. दरम्यान चिकनगुनिया, झिका आणि डेंगी या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com