Nandurbar News : धबधब्याच्या वाहत्या प्रवाहात जाऊन तरुणांची स्टंटबाजी

Nandurbar News : डोंगरावरून पाणी वाहत असल्याने निसर्गाचे हे सौदर्य पाहण्यासाठी व आनंद लुटण्याच्या उद्देशाने पर्यटनासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेशसह गुजरात राज्यातील पर्यटक मोठ्या संख्येने सातपुड्यात दाखल होत आहेत
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : पाऊस सुरु असल्याने सर्वत्र पूर आले आहेत. तर सातपुड्याच्या काही भागात धबधबे देखील प्रवाहित झाले आहेत. अशाच प्रकारे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात असलेल्या वाल्हेरी धबधबा देखील प्रवाहित झाल्याने या निसर्गरम्य ठिकाणी अनेकजण येत आहेत. दरम्यान या धबधब्यावर आलेले काही पर्यटक तरुण हे वाहत्या पाण्याच्या प्रवाहात स्टंटबाजी करत असल्याचे दिसून येत आहे. 

Nandurbar News
Gadchiroli Heavy Rain : चौथ्या दिवशीही गडचिरोलीत पूर परिस्थिती कायम; तीन राष्ट्रीय महामार्गासह २३ प्रमुख मार्ग बंदच

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात पावसानंतर सातपुड्याचा नैसर्गिक सौंदर्य बहरले आहे. सगळीकडे हिरवड पसरली असून डोंगरावरून पाणी वाहत असल्याने निसर्गाचे हे सौदर्य पाहण्यासाठी व आनंद लुटण्याच्या उद्देशाने पर्यटनासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेशसह गुजरात राज्यातील पर्यटक मोठ्या संख्येने सातपुड्यात (Satpuda) दाखल होत आहेत. यातच तळोदा तालुक्यातील प्रसिद्ध वाल्हेरी धबधब्यावर पर्यटकांची चांगलीच गर्दी होत आहे. वाल्हेरी धबधब्यावर महिलांना बघून काही तरुण हुल्लडबाजी करत असल्याचे दिसून येत आहे. 

Nandurbar News
Budget 2024 Impact : बजेटनंतर लगेच सोनं झालं स्वस्त; जळगावात ₹ २५००, तर पुण्यात ३००० रुपयांनी घसरला!

इकडेच नाही तर धबधब्याच्या (waterfall) वाहत्या प्रवाहावरती जाऊन स्टंटबाजी देखील करताना पाहायला मिळत आहेत. येथे जाऊन फोटो सेशन करण्यासाठी अनेक पर्यटक हे जीव धोक्यात घालून फोटो सेशन करतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. याठिकाणी कोणत्याही प्रकारचे सुरक्षा नसल्याने अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. यामुळे येथे स्टंटबाज आणि हुल्लडबाजी करणाऱ्यांवर आता कारवाईची मागणी होऊ लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com