सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्राच्या वनविभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. वनविभागात विविध प्राण्यांचा, पक्ष्यांचा बचाव करणे, त्यांना काही लागल्यावर उपचार करणे, वन्यप्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी ही भरती राबवण्यात येणार आहे. (Vanvibhag Bharti)
महाराष्ट्र शासन वनविभागाने या नोकरीबाबत जाहिरात प्रकाशित केली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२५ आहे.
वनविभागातील या नोकरीसाठी २५ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड ११ महिन्याच्या कालावधीसाठी केली जाणार आहे. (Government Job)
पशुवैद्यकीय डॉक्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने B.V.Sc पदवी प्राप्त केलेली असावी.जीवशास्त्रज्ञ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने B.V.Sc/ B.Sc in Zoology पदवी प्राप्त केलेली असावी. २ जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना २५००० ते ५०,००० रुपये पगार मिळणार आहे.
या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला रिझुम्ये defwadsa@gmail.com या मेलवर पाठवायचा आहे किंवा उपवनसंरक्षक (प्रा.)वडसा वनविभागाचे कार्यालय, वडसा, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली ४४१२०७ येथे पाठवायचा आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग केली जाईल. त्यानंतर मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. याबाबत माहिती उमेदवारांना दिली जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.